पुढारी ऑनलाईन डेस्क : जग आता कोठे कोव्हिडच्या जागतिक संकटातून सावरले आहे. पण संशोधकांना आता नवी भीती सतावत आहे. आर्क्टिक येथे परमाफ्रॉस्टचे थर आहेत. वाळू, गाळ, लहान दगडगोटे यांना बर्फ बांधून ठेवते, या थराला परमाफ्रॉस्ट असे म्हटले जाते. हे थर काही वर्ष अगदी दोन वर्षं ते अगदी सात लाख वर्षं जुने आहेत. हे थर आता वितळू लागले आहेत. यातून काही अतिशय धोकादायक विषाणू बाहेर पडले तर यातून किती तरी मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशार संशोधकांनी दिला आहे. Zombie Viruses
या विषाणूंना संशोधक झोंबी व्हायरस म्हणतात. हे विषाणू गेली हजारो वर्षं सुप्त अवस्थेत आहेत. जागतिक हवामान बदल आणि तापमान वाढ यामुळे हे विषाणू बाहेर पडून पृथ्वीवर थैमान घालू शकतात, असे गुणसूत्रांवर संशोधन करणारे जीन मिशेल क्लाव्हेरी यांनी दिला आहे. क्लाव्हेरी Aix – Marseillie Universityचे प्राध्यापक आहेत. हा धोका खरा आहे, आणि आपल्याला यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. ही बातमी इकॉनॉमिक टाइम्समध्ये देण्यात आली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ आर्क्टिक ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था प्राचीन सूक्ष्म जीवांपासून होणाऱ्या आजारांवर काम करते. या जीवांमुळे होऊ शकणारे आजार हाताबाहेर जाऊ नयेत, यासाठी ही संस्था काम करते.
संशोधक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यांना परमाफ्रॉस्टमधील विषाणूंबद्दल चिंता वाटते. परमॉफ्रॉस्टचा सर्वांत खोलवर थर हा काही दशलक्ष वर्षांपासून गोठलेला आहे. तर माणसाचा इतिहास हा तीन लाख वर्षांचा आहे. त्यामुळे आधुनिक मानवात परमॉफ्रॉस्टमधील विषाणूंच्या विरोधात रोगप्रतिकार शक्ती नाही. क्लाविर म्हणाले, "यातील कितीतरी विषाणू आणि मनुष्य यांचा कधी संपर्कच आलेला नाही, ही काळजीची स्थिती आहे. निअँडरथल मानवाला जर अशा अनभिज्ञ विषाणूंचा प्रादूर्भाव झाला असता तर काय झाले असते? आता ही शक्यता खरी वाटू लागली आहे."
या बातमीत मेथुसेलाह मायक्रोब्ज यांचा उल्लेख आहे. यांना झोंबी व्हायरस असे म्हटले जाते, याचे कारण म्हणजेच गोठलेल्या मातीत हजारो वर्षं 'सुस्थितीत' राहू शकतात. उत्तर गोलार्धात जवळपास २० टक्के भूभाग अशा गोठलेल्या मातीतचा आहे. हे सूक्ष्म जीव आजार पसरवू शकतात.
हेही वाचा