Latest

Zombie Drug : झोंबी ड्रग्जसाठी कबरी उकरु लागले लोक; अखेर ‘या’ देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित

मोहन कारंडे

पुढारी : ऑनलाईन डेस्क : अमली पदार्थांची विक्री आणि त्यांचे सेवन यावर नियंत्रण मिळवणे जगासाठी आव्हान बनत चालले आहे. अमली पदार्थाच्या एक भयंकर प्रकाराने पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिऑन (Sierra Leone) या देशात उच्छाद मांडला आहे. या देशात एका विशिष्ट प्रकारचे अमली पदार्थ बनवण्यासाठी मानवी हाडांचा वापर केला जात आहे. मानवी हाडे मिळवण्यासाठी कबरी खोदून त्यातून सांगाडे चोरण्याचे प्रकार या देशात इतके वाढले आहेत, की या देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करावी लागली आहे. (Zombie Drug)

या अमली पदार्थाला झोंबी ड्रग किंवा कुश असे नाव आहे. या अमली पदार्थाच्या आहारी गेलेले लोक दफनभूमीत कबीर खोदून त्यातील सांगाडे लंपास करू लागले आहेत. हा अमली पदार्थ बनवण्यासाठी विविध विषारी घटक आणि मानवी हाडांची पावडर वापरली जाते. मानवी हाडे अमली पदार्थातील मुख्य घटक असतो. या देशातील पोलिसांनी यामुळे दफनभूमींना संरक्षण पुरवले आहे. (Zombie Drug) राष्ट्राध्यक्ष ज्युलिअस मादा बिओ (Julius Maada Bio) यांनी नाशाबाजी हा देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनल्याचे म्हटले आहे. या देशात व्यसनमुक्तीवर कार्यरत असलेले एकच रुग्णालय आहे. कुश अमली पदार्थामुळे या रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या गेल्या ४ वर्षांत ४००० टक्केंनी वाढलेली आहे, असे Financial Express या वेबसाईटने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. या अमली पदार्थाचे सेवन रोखण्यासाठी देशात टास्क फोर्सही स्थापन करण्यात आला आहे.

झोंबी ड्रग्ज झायलाझीनचा वापर प्राण्यावर उपचार करताना भूल देण्यासाठी याचा वापर होतो. यामध्ये कोकेन, हेरॉईन, फेंटानाईल यांचे मिश्रण करून अमली पदार्थ बनवले जाते. याला झोंबी ड्रग्ज म्हटले जाते. या अमली पदार्थाच्या सेवनानंतर व्यक्ती शुद्ध हरपते आणि ती बेफाम वागू लागतात. हिंसक बनतात.

झोंबी हा विषय घेऊन मराठीत निघालेला एक चित्रपट काही वर्षांपूर्वी बरा चालला. या चित्रपटाने हा संसर्गजन्य अघोरी प्रकार चर्चेत आणला होता. बॉलीवूडमध्ये निर्मात्यांनाही झोंबीचे बरेच आकर्षण आहे. मात्र, या झोंबीसाठी कबरी खोदल्या जावू लागल्याने हा विषय प्रथमच प्रत्यक्षात आला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT