Latest

You Tube : एक गाव यू ट्यूबर्सचे!

Arun Patil

रायपूर : You Tube : जगाच्या पाठीवर अनेक वैशिष्टपूर्ण गावे आहेत. जुळ्यांचे गाव, झोपाळूंचे गाव, बुटक्यांचे गाव, संस्कृत बोलणार्‍या लोकांचे गाव अशी अनेक गावे पाहायला मिळतात. छत्तीसगढमध्ये 'यू ट्यूबर्सचे गाव' आहे! या गावातील अनेक लोक यू ट्यूब चॅनेल चालवतात!

You Tube यू ट्यूबच्या माध्यमातून देशातील अनेक तरुण मोठ्या प्रमाणावर पैसे कमावत आहेत. छत्तीसगडच्या रायपूरमधील तुलसी गावाला तर 'यू ट्यूबर्सचे गाव' म्हणतात. या गावात सुमारे 432 कुटुंबे राहतात. त्यांची लोकसंख्या 3000-4000 च्या दरम्यान आहे. यापैकी 1000 लोक यू ट्यूबच्या माध्यमातून त्यांचे उत्पन्न कमावत आहेत. या गावात राहणार्‍या 5 वर्षांच्या मुलापासून ते 85 वर्षांच्या आजीपर्यंत अनेक लोक यू ट्यूबवर सक्रिय आहेत. गावात यू ट्यूबचे वेड दोन मित्रांनी सुरू केले होते.

तुलसी गावात राहणारे दोन मित्र जय आणि ज्ञानेंद्र यांनी 2016 मध्ये You Tube यूट्यूब चॅनल सुरू केले. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेला जय वर्मा पूर्वी एक कोचिंग सेंटर चालवत असे, ज्यामध्ये ते इयत्ता 11 वी ते बी.एस्सी.पर्यंतच्या मुलांना शिकवायचे. त्यानंतर त्याने शेजारी राहणार्‍या ज्ञानेंद्रसोबत यू ट्यूबवर कॉमेडी व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली. तर ज्ञानेंद्र हे एसबीआयमध्ये अभियंता होते. त्याला बँकेकडून हायस्पीड इंटरनेट मिळाले.

You Tube यू ट्यूब व्हिडीओ बघत असताना तो स्वतः बनवू लागला. रायपूरच्या तुलसी गावात सर्जनशील लोकांची कमतरता नाही. या दोन मित्रांना गावकरी खूप सहकार्य करतात. त्याच्या व्हिडीओजमध्ये विनोदाची छटा जोडणे असो किंवा ज्ञानाचा साठा देण्यासाठी, गावातील लहान मुलांपासून ते वडीलधार्‍यांपर्यंत ते सदैव आपले योगदान द्यायला तयार असतात. आता गावातील लोकांनी 40-50 वाहिन्या बनवल्या आहेत. पूर्वी हे लोक मोबाईलवर शूटिंग करायचे; पण आता त्यांच्याकडे कॅमेरा आणि शूटिंगची इतर साधने उपलब्ध आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT