Latest

युपीत पुन्हा एकदा योगी सरकार; योगींच्या २.० मंत्रिमंडळात ब्राह्मण, दलित आणि राजपूतांचा पगडा !

backup backup

लखनौ ; पुढारी ऑनलाईन : योगी आदित्यनाथ यांनी आज (दि.२५) शुक्रवारी भव्य दिव्य सोहळा करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. योगींनी उत्तर प्रदेश सरकारच्या दुसऱ्या टर्मची शपथ घेतली, यामध्ये दोन उपमुख्यमंत्री तर ५२ मंत्र्यांचा समावेश आहे. याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जाऊनही केशव प्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या नावाची जोरदार चर्चा असणाऱ्या दिनेश शर्मा यांचा पत्ता कट झाल्याने सर्वांनाच धक्का बसल्याचे बोलले जात आहे. (Yogi 2.0)

शर्मांच्या जागी आणखी एक ब्राह्मण चेहरा ब्रिजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. योगी २.० मंत्रिमंडळात यावेळीही जातीय समीकरणाची काळजी घेण्यात आली आहे. ८ ब्राह्मण आणि तेवढ्याच दलित समाजातील लोकांना मंत्री करण्यात आले आहे.

या सोहळ्याला देशातील मान्यवरांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. लाखो लोकांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. योगी २.० मंत्रिमंडळात गेल्यावेळेप्रमाणेच यावेळी २ उपमुख्यमंत्री करण्यात आले आहेत. दोन उपमुख्यमंत्र्यांशिवाय, १६ कॅबिनेट मंत्री, १४ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि २० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.

Yogi 2.0 : मुस्लिम, शीख आणि ब्राम्हण कायस्थ समाजातील 1-1 मंत्री

योगी २.० मंत्रिमंडळात ब्राम्हण कायस्थ, मुस्लिम आणि शीख समुदायातील प्रत्येकी एक मंत्री घेण्यात आले आहेत. गेल्यावेळी एकमेव मुस्लिम मंत्री असलेले मोहसीन रझा यांच्या जागी युवा नेते दानिश आझाद अन्सारी यांना राज्यमंत्री करण्यात आले. तर सिद्धार्थनाथ सिंह यांचा पत्ता कट करत अरुणकुमार सक्सेना, या ब्राम्हण कायस्थ चेहऱ्याच्या भूमिकेत एंट्री करण्यात आली आहे.

योगी २.० च्या मंत्रिमंडळात ५ जाट, २ यादव आणि २ भूमिहार समुदायाचे मंत्री आहेत. यूपीमध्ये भाजपचे ४६ ब्राह्मण आमदार आहेत. या समुदायाचा विचार करून मंत्रिमंडळात ८ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाजपचे ४३ आमदार राजपूत असून या समाजातील ६ नेत्यांना मंत्रीपद मिळाले आहे. भाजपकडे एससी आणि एसटी समाजाचे ६५ आमदार आहेत. योगी २.० मंत्रिमंडळात या समाजातील ८ नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

Yogi 2.0 : हे आहेत युपीतील मोदींचे शिलेदार

केशव प्रसाद मौर्य – उपमुख्यमंत्री, ब्रजेश पाठक – उपमुख्यमंत्री,

कॅबिनेट मंत्रीमंडळ

स्वतंत्र देव सिंह, प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, बेबी रानी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जय वीर सिंह, धर्मपाल सिंह, नंद गोपाल नंदी, भूपेन्द्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, आशीष पटेल, संजय निषाद,

राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार

नितिन अग्रवाल, कपिल देव अग्रवाल, रविन्द्र जायसवाल, संदीप सिंह – स्वतंत्र प्रभार- लोध (पिछड़ा), गुलाब देवी, गिरीष चंद यादव, धर्मवीर प्रजापती, असीम अरुण, जेपीएस राठौर, दयाशंकर सिंह, नरेन्द्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरुण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्र दयालू.

राज्यमंत्री

मयंकेश्वर शरण सिंह, दिनेश खटीक, संजीय गौंड, बलदेव सिंह औलख, अजीत पाल, जसवंत सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल, संजय गंगवार, बृजेश सिंह, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनूप प्रधान 'वाल्मीकि', प्रतिभा शुक्ला, राकेश राठौर 'गुरु', रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आजाद अंसारी, विजय लक्ष्मी गौतम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT