Latest

WTC Final 2023 : मुझसे शादी करोगे?, शुभमन गिलला प्रेक्षक तरुणीकडून लग्नाचा प्रस्ताव

Shambhuraj Pachindre

लंडन; वृत्तसंस्था : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तिसर्‍या दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला होता. त्यानंतर स्टँडमधील एका तरुण चाहतीने शुभमन गिलला लग्नाचा प्रस्ताव दिला. तिने तिची पोस्टर्स आणली होती. त्या पोस्टरवर लिहिले होते, 'शुभमन मुझसे शादी करोगे?' (WTC Final 2023)

तरुणीने पोस्टर पडद्यावर दाखवण्याआधी आधीच्या एका चेंडूवर शुभमन गिलने मोठी चूक केली. मोहम्मद सिराजचा चेंडू मार्नस लॅबुशेनने गलीच्या दिशेने खेळला. तिसर्‍या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना गिलने डायव्हिंग करून चेंडू रोखला. (WTC Final 2023)

दरम्यान, नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभे असलेले लॅबुशेन आणि ख्वाजा यांच्यात धाव घेताना गोंधळ उडाला आणि दोघेही बॅटिंग एंडच्या जवळ पोहोचले. गिलला आरामात उठून थ्रो मारण्याची संधी होती, पण त्याने न बघता चेंडू बॅटिंग एंडच्या दिशेने फेकला. तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. अशाप्रकारे भारतीय संघाने धावबाद करण्याची सोपी संधी गमावली.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT