Latest

Wrestlers Protest : काही लोक आमच्या आंदोलनाला प्रक्षोभक बनवू पाहत आहेत; कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचा आरोप

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात सुरु असलेल्या पैलवानांच्या आंदोलनाला काही लोक प्रक्षोभक बनवू पाहत आहेत, असा आरोप प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. जंतर मंतरवर आंदोलनस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध देण्यात आलेल्या घोषणा बाजीनंतर पुनिया यांनी ही पत्रकार परिषद घेतली. (president PT Usha continues)

देशाच्या मुली न्यायासाठी झगडत आहेत, पण लोक हे आंदोलन प्रक्षोभक करू पाहत आहेत, असे सांगून पुनिया म्हणाले की, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे. आंदोलनाला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते सहन केले जाणार नाही. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. काही लोक पीडित पैलवानांवरच आरोप करत आहेत. आमच्यापैकी कोणत्याही खेळाडूचे गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. याउलट ब्रिजभूषण सिंग यांचे रेकॉर्ड गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. (Controversy between wrestler and former athlete, Bajrang Punia)
ब्रिजभूषण यांनी असे कोणते मोठे काम केले आहे की त्यांना फुलांचा हार घातला जात आहे. खरे तर सिंग यांच्यापेक्षा मोठा गुन्हेगार भारतात नाही, असा आरोप पुनिया यांनी केला. दरम्यान आंदोलनाला विविध राज्यांतील खेळाडू पाठिंबा देत असल्याची माहिती कुस्तीपटू विनेश फोगट हिने दिली. पंतप्रधानांनी देखील आमच्या मनातले ऐकावे. कोट्यवधी लोक आमच्या पाठिशी आहेत, हीच आमची ताकद आहे, असे तिने सांगितले. (Indian Olympic Association (IOA)
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT