Latest

World’s largest hotel : तब्बल दहा हजार खोल्यांचे भव्य हॉटेल!

Arun Patil

रियाध : जगातील सर्वांत मोठे हॉटेल अरेबियातील मक्का या पवित्र शहरात बनत आहे. त्याचे नाव 'अबराज कुदाई' असे आहे. या हॉटेलमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त खोल्या व 70 रेस्टॉरंटस् असणार आहेत. हे हॉटेल 2017 मध्ये बांधून पूर्ण होणार होते; पण अजूनही त्याचे काम चालूच आहे. ( World's largest hotel ) यासाठी 3.5 अब्ज डॉलर्स एवढा खर्च येणार आहे. कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे या हॉटेलचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.

सध्या रेकॉर्डनुसार रशियातील मॉस्को या शहरातील हॉटेल इज्मेलोवो हे जगातील सर्वात मोठे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये जवळपास 7500 खोल्या आहेत. या हॉटेलचा विक्रम मोडण्यासाठी दुसर्‍या हॉटेलांना काही अवधी लागू शकतो. या हॉटेलचे चार टॉवर असून प्रत्येक टॉवर हा 30 मजली आहे. प्रत्येक टॉवरला ग्रीक वर्णमालेनुसार अल्फा, बिटा अशी नावे दिलेली आहेत. 1980 मध्ये ऑलिम्पियाड दरम्यान याच हॉटेलमध्ये खेळाडूंना उतरवण्यात आले होते.

World's largest hotel : 45 मजली उंच हॉटेलवर चार हेलिपॅड

सध्या 'जगातील सर्वात मोठे हॉटेल' ठरेल अशा हॉटेलचे सौदी अरेबियातील मक्का या शहरात उभारणी होत आहे. या हॉटेलात सुमारे 10,000 खोल्या असतील. 12 टॉवरच्या या हॉटेलमध्ये खोल्यांशिवाय दिवस-रात्र चालू राहणारी 70 रेस्टॉरंटस् असतील. या हॉटेलचे नाव 'अबराज कुदाई' असून 45 मजली उंच या हॉटेलच्या वर पाहुण्यांची हेलिकॉप्टर उतरवता यावीत यासाठी चार हेलिपॅड तयार केलेले आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT