पुढारी ऑनलाइन डेस्क : World's First Engineer : सृष्टीचे शिल्पकार विश्वाचे पहिले अभियंता स्वर्गाची रचना करणारे, वास्तु कशी उभारावी याचे जगाला ज्ञान देणारे विश्वकर्मा यांची जयंती आज देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊया…
World's First Engineer देशाच्या विविध भागांमध्ये विश्वकर्मा जयंतीनिमित्त बाजारपेठा सजल्या होत्या. जयंतीच्या पूर्व संध्येला लोकांनी पूजनाचे साहित्य खरेदी केले. यामध्ये सजावटीचे सामान, पूजेचे सामान आदींचा समावेश होता. तसेच देव शिल्पी विश्वकर्मा यांच्या प्रतिमा लोकांनी आपल्या घरासाठी नेल्या. फूल-हार-फळे आदी सामग्रींसह मिठाईच्या दुकानात देखिल गर्दी होती.
आज शनिवारी विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त आदल्यादिवशी विविध भागांमध्ये दुकानदारांनी आपल्या दुकानात सफाईचे कार्य मोठ्या प्रमाणात केले. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, विश्वकर्मा हे देवांचे शिल्पकार होते. त्यांनी स्वर्ग तसेच अलंकापूरीची रचना केली. तसेच वास्तूशास्त्र हे देखिल विश्वकर्मा यांचीच देण आहे. वास्तू शास्त्राचे ज्ञान विश्वकर्मा यांच्याकडूनच पुढच्या पिढ्यांकडे आले. नंतर त्यावर आधारित अनेक ग्रंथ लिहिले गेले.
विश्वकर्मा यांना आद्य अभियंते म्हणजेच इंजिनिअर World's First Engineer मानले जाते. भारतात जसे धन्वंतरी यांना सर्वात पहिले वैद्य आयुर्वेदाचे प्रणेते किंवा आरोग्याची देवता म्हणून पूजले जाते. त्याच प्रमाणे विश्वकर्मा यांना सृष्टीचे शिल्पकार म्हणून पूजले जाते. एखादी वास्तू कशी बांधावी. वास्तू बांधताना कोणत्या दिशेत काय असायला हवे याचे सर्वप्रथम ज्ञान विश्वकर्मा यांनी दिले, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. तसेच ते सर्व अभियंत्यांचे आद्य प्रेरणा स्थान आहे. विश्वकर्मा हे नवनिर्मिती आणि सृजनात्मक कार्याचे आद्य प्रेरणा स्थान मानले जाते.
पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना ट्विटर वरून विश्वकर्मा जयंतीच्या World's First Engineer शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, "भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने नवनिर्माण आणि नवनिर्मितीसह सर्व प्रकारच्या सर्जनशील कार्याशी निगडित कर्मयोगींना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमचे कौशल्य आणि कर्तव्य देशाला अनंतकाळात नवीन उंचीवर नेणार आहे."
हे ही वाचा :