Latest

World Bicycle Day : नाशिक सायकलिस्ट’च्या महिलांची शुक्रवारी दहावी पंढरपूर वारी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कधी काळी दुर्लक्षित झालेल्या सायकलला आता खऱ्या अर्थाने ग्लॅमर आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने सायकल महत्त्वाची असल्याने शहरात सायकल चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. जो व्यक्ती सायकल बॅलन्स करू शकतो तो जीवनात कोणतीही गोष्ट बॅलन्स करू शकतो. सायकलचा प्रचार-प्रसार करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने २०१८ मध्ये ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला होता.

नाशिकचे पोलिस उपआयुक्त हरीश बैजल यांच्या पुढाकाराने २०१२ मध्ये नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची स्थापना झाली. सुरुवातीला नवरात्रात चांदवड, वणी, येवला याठिकाणी सायकल राइड सुरू झाल्या. नंतर पंढरपूर सायकलर वारीला सुरुवात झाली. ३५० किमी असणारी ही राइड पहिल्यांदा महिला-मुलींसाठी मोफत ठेवली होती. सध्या या फाउंडेशनमध्ये ५० महिला सायकलिस्ट आहेत. तीन दिवस सुरू असणाऱ्या पंढरपूर वारीचे यंदाचे दहावे वर्ष असून, ९ जूनला ३०० सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी जाणार आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने यंदा पहिल्यांदा महिलांसाठी आठ दिवसांचे सायकल शिबिर गोल्फ क्लबवर घेण्यात आले. महिलांना सायकल चालवण्याची आवड असते पण सायकल न चालवण्याची खंत मनात राहून जाते. त्यासाठी खास शिबिराचे आयोजन केले होते. त्यामुळे फाउंडेशनकडून दरवर्षी शिबिर घेण्यात येणार आहे.

सायकल कशी निवडावी

माउंटन बाइक ही कोणत्याही रस्त्यावर चालू शकते. तिचे टायर जाड असल्याने दगड, कच्चा रस्ता सहज पार करता येतो. गिअर ॲडजस्ट करता येत असल्याने जर्क बसत नाही शिवाय जास्त वजन असणारी व्यक्ती सायकल चालवू शकते. हायब्रीड बाइकला मध्यम आकाराचे यर असतात. कच्चा आणि पक्का दोन्ही रस्त्यांवर सायकल चालते. रोड बाइकला मात्र बारीक टायर असतात. जी सायकल रेससाठी वापरली जाते, वजनाने हलकी असते तिचे हॅण्डल खाली असल्याने हवेचा जोर असल्यास वाकून चालवावी लागते. कम्फर्टनुसार सायकलची निवड करावी. बाजारात १० हजारांपासून ८ लाखांपर्यंत किमतीच्या सायकल्स उपलब्ध आहेत.

सायकल चालवण्याचे फायदे

मानसिक ताणतणाव कमी होतो. गुडघा प्रत्यारोपण कॉमन असले, सायन्स अत्याधुनिक झाले तरी सायकलिंगशिवाय चांगला व्यायाम नाही. सायकल ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते. तिला पेट्रोल लागत नाही. प्रदूषण होत नाही. वजन नियंत्रणात राहते. आठवड्यातून पाच दिवस ३० किमी सायकल चालवली पाहिजे. रस्त्यात येणाऱ्या चढ-उतारामुळे शरीराची ऊर्जा कळते. मुलींमध्ये पीसीओडी, अनियमित पाळीचे प्रमाण वाढले आहे त्यांनी नियमित सायकलिंग केले तर या समस्या कमी होतात.

टॅन्डम बाइक या सायकलला दोन सीट व दोन पँडल असतात. याच सायकलवर पाचवी पंढरपूर सायकल वारीला गेले असताना दृष्टिहीन मुलाला डबलसीट नेले होते. २०१२ पासून सायकलिंग करते. यंदाची माझी दहावी पंढरपूर सायकल वारी असणार आहे.

– डॉ. मनीषा राैंदळ, संस्थापक सचिव, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT