कुटुंब कलह  
Latest

पिंपरी : शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून महिलेवर बलात्कार

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

लॉजवर नेलेल्या महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. तसेच, महिलेची दीड लाखाची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. हा प्रकार जुलै 2019 ते मार्च 2021 दरम्यान बाणेर येथे घडला.

परीक्षित सुभाष पाटील (43, रा. धायरी पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 6) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे 'सिक्युरिटी एजन्सी' चालवत होते. दरम्यान, जुलै 2019 मध्ये आरोपीने फिर्यादी यांना कामाचे काहीतरी बोलायचे आहे, असे सांगून लॉजवर नेले. काहीतरी अर्जंट काम असल्याचे सांगून आरोपी बाहेर गेला. थोड्या वेळाने येऊन त्याने फिर्यादी यांना शीतपेयातून गुंगी आणणारे औषध दिले. त्यानंतर फिर्यादी यांच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर मार्च 2021 मध्ये फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने पुन्हा फिर्यादी यांच्यावर बलात्कार केला. तसेच, फिर्यादी यांनी पुरवलेल्या सिक्युरिटीचे सुमारे दीड लाख रुपये आज देतो, उद्या देतो असे म्हणून विश्वासघात केला. दरम्यान, आरोपीने 'तू कशी काम करते' असे धमकावून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी फिर्यादी यांचा पाठलाग केला. 'तू आली नाही तर मी तुला घरात घुसून उचलून पळवून नेईल. तुझे पैसे देणार नाही. तुझ्या पोराला जिवंत सोडणार नाही. तुझी सुपारी देतो. माझ्या एका कॉलवर तुझा कार्यक्रम होईल. तुझ्यावर मी खोट्या केस करून तुझी बदनामी करेन', असे धमकावले. 19 मे 2022 रोजी एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना फोन केला. 'तू परीक्षितच्या घरी कॉल का केला', अशी धमकी देत फोनवरील व्यक्तीने फिर्यादी यांना अश्लील भाषेत बोलून विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT