Latest

Woman Enjoys : व्हायरल व्हिडिओ! पाहावे ते नवलच; ‘ही’ महिला खाते हवेत उडताना केक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : अनेकदा काही लोक हे खाण्याचे शौकिन असतात. यामध्ये काही लोक प्रवास करताना चालतात तर काहीजण फिरत फिरत फिरत खाण्याचा आस्वाद घेताना दिसतात. बहुतेक लोक त्यांच्या घरातील डायनिंग टेबलवर किंवा जमिनीवर शांतपणे खाण्याचा आनंद घेतात. पण काही लोक असेही असतात, की ते हवेत आपल्या आवडीचा पदार्थ खाण्याचा आनंद (Woman Enjoys) घेण्यासाठी ते स्वत:ला रोखू शकत नाहीत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. नुकताच असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या अप्रतिम खाण्याच्या शैलीने लोकांना आश्चर्यचकीत करताना दिसत आहे. इंटरनेटवर घबराट निर्माण करणाऱ्या या व्हिडीओमध्ये यूजर्सही खूप रस घेताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक महिला हजारो फूट उंचीवर हवेत उडताना भिती न बाळगता बिनधास्त चॉकलेट केक खाताना (Woman Enjoys) दिसत आहे. या व्हिडिओवर काही यूजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काही यूजर्स या महिलेच्या कृतीला मुर्खपणाही असल्याचे म्हणत आहेत.

हा व्हिडिओ मैककेना नाइप नावाच्या महिलेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. असे सांगितले जात आहे की, मैककेना नाइप ही एक इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर (Woman Enjoys) आहे. जी अनेकदा आपल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. नुकताच व्हायरल होत असलेल्या तिच्या या व्हिडिओमध्ये हजारो फूट उंचीवर हवेत उडताना तिच्या हातात चॉकलेट केकचा बॉक्स दिसतो. यानंतर ती हवेत उडतानाच त्या बॉक्समधील चॉकलेट केक (Chocolate Pie Cake) काढत तो आनंदाने खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सर्वसामान्यांच्या दृष्टीने खरोखरच धक्कादायक आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT