Latest

Maha Assembly App : हिवाळी अधिवेशन आता मोबाईलमध्ये पाहता येणार!

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी एक मोबाईल अॅप सुरु करण्यात आले आहे. 'महा असेंब्ली' असे या अ‍ॅपचे नाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (दि. २१) हे मोबाईल ॲप सुरु करण्यात आले आहे. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन येथे हा कार्यक्रम झाला. (Maha Assembly App)

विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. अ‍ॅपच्या निर्मितीसाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे विशेष सहाय्य करण्यात आले असून सध्या प्रायोगिक तत्वावर गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप मंत्री, आमदार आणि सचिवांसाठी उपलब्ध होऊ शकेल.

याप्रसंगी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, ॲपची निर्मिती करणाऱ्या सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर आदी मान्यवर उपस्थित होते. 'महा असेंब्ली' अ‍ॅपद्वारे हे अधिवेशन दैनंदिनी, अधिवेशन काळात आयोजित विविध बैठकांचा तपशील, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक असणारी टेलिफोन निर्देशिका, निवास व्यवस्थेबद्दल परिपूर्ण माहिती एका क्लिकवर अधिवेशन काळात उपलब्ध होऊ शकणार आहे. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या अ‍ॅपचा आढावा घेऊन हे अ‍ॅप महत्वपूर्ण ठरेल, अशी भावना व्यक्त केली.

या अ‍ॅपची निर्मिती नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल तालुक्यात कार्यरत सेटट्राईब या आयटी कंपनीच्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी 4 दिवसात केली आहे. सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर यांना स्टार्टअप यात्रा या उपक्रमात ई-प्रशासन प्रकारामध्ये राज्यस्तरीय विजेता म्हणून नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे ग्लोबल क्वालिटी स्किल या अ‍ॅपच्या निमित्ताने जगासमोर आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT