सत्यजित तांबे,www.pudhari.news 
Latest

Satyajit Tambe : मी अपक्षच, काँग्रेस सोडलेली नाही : सत्यजित तांबे यांची स्पष्टोक्ती

अविनाश सुतार

नाशिक, पुढारी ऑनलाईन : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक काळात दिल्लीतील नेतृत्त्‍व आमच्याशी चर्चा करत होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमच्या विरोधात बोलत होते. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचे षड्यंत्र रचण्यात आले; परंतु मी भविष्यात अपक्ष राहणार असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचेही मार्गदर्शन घेऊन काम करत राहणार आहे, मी काँग्रेस सोडलेली नाही, असे नूतन आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी आज (दि. ४) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

तांबे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी, कटकारस्थान रचण्यात आले. माझा कुटुंबावर आरोप करणे, हे स्क्रिप्टेड षड्यंत्र होते. ही स्क्रिप्टेड स्टोरी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी रचण्यात आली, असा आरोपही तांबे (Satyajit Tambe) यांनी यावेळी केला.

गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये निष्ठेने काम करतोय. परंतु निवडणुकीदरम्यान तांबे कुटुंबियांवर अनेक आरोप करण्यात आले. युवक प्रदेशचा अध्यक्ष असताना काँग्रेसचे संघटनात्मक काम केले. २०३० मध्ये तांबे कुटुंबाला काँग्रेसमध्ये १०० वर्ष पूर्ण होतील. युवक काँग्रेसमध्ये काम करताना ५० केसेस असलेला एकमेव मी आहे. परंतु वडील आमदार असल्याने तुम्हाला संधी देता येणार नाही,असे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. काँग्रेसची परिस्थिती वाईट असताना काम केले. चांदा ते बांदा काम केले. पक्षश्रेष्ठींकडे जेव्हा काही मागितले, तेव्हा संधी देण्यात आली नाही, असेही ते तांबे यांनी सांगितले.

दुसरी कुठेही संधी नाही, वडिलांच्या जागेवर लढण्यास एच. के. पाटील यांनी सांगितले. पण पक्षासाठी काम करूनही संधी दिली नाही. नागपूर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाचा एबी फार्म मला देण्यात आला. ११ तारखेला अर्ज भरताना चुकीचे अर्ज असल्याचे लक्षात आले. प्रदेश कार्यालयाने चुकीचे अर्ज का दिले ? चुकीचे अर्ज देणाऱ्यावर काँग्रेस काय कारवाई करणार ?, असा सवाल तांबे यांनी यावेळी केला. निवडणुकी दरम्यान, भाजप पाठिंब्यांच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या. काँग्रेसचा पाठिंबा मिळण्यासाठी मला पत्र द्यायला सांगितला, मला जाहीर माफी मागण्यास सांगितले, असेही तांबे यांनी सांगितले.

फॉर्म दिला मात्र तो कोरा नव्हता. मी काँग्रेस म्हणूनच उमेदवारी अर्ज भरला होता. आम्ही महविकास आघाडीचे उमेदवार अशी भूमिका घेतली होती. परंतु भाजपा मध्ये ढकलण्याचे काम काही लोकांनी केले. मी सर्व पक्षातील लोकांशी संपर्क साधून सहकार्य मागितले. महविकासने मला पाठिंबा द्यावा, यासाठी मी सर्वांना भेटण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीतून मला पत्र देऊन जाहीर माफी मागा आणि मगच काँग्रेस पाठिंबा देईल, असे मला सांगण्यात आले. थोरात आणि पटोले यांचेही बोलणं झाले होते. प्रदेश अध्यक्ष मात्र आरोप करून थोरात आणि तांबे यांच्यावर फसवणुकीचे आरोप करत होते. कोणतीही चूक नसताना माफी मागायला लावत होते. राजीव गांधी भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसरीकडे पटोले मात्र तोडण्याचे काम करत होते. आमच्या परिवराबाबत द्वेष पसरवण्याचे काम केले. भाजपने मला सहकार्य केले. शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेसचे मोठे सहकार्य केले.

भाजपचे अनेक कार्यकर्ते येऊन भेटत होते की, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काँग्रेसने हात से हात जोड उपक्रम सुरू केला आहे. मात्र, सध्या पैर में पैर् अडकानेका काम सुरू आहे. माझ्या वडिलांना पाच मिनिटात निलंबित केले. आम्हाला साधी विचारणा देखील केली नाही. मात्र, आरोपांमुळे मी स्पष्टीकरण द्यावे लागले. मला काँग्रेस बाहेर ढकलण्याचे काम केले जात आहे. मला अनेक शिक्षक संघटना यांनी मदत केली आहे. अपक्ष निवडून आलो. त्यामुळे अपक्ष म्हणूनच मी यापुढील काम करणार आहे. शरद पवार यांना काँगेस अंतर्गत प्रश्न असल्याने त्यांचा प्रश्न त्यांना सोडवू द्या, असे सांगितले होते.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT