Latest

राहुल कुल यांना मंत्रिपदाची ‘पॉवर’ मिळणार का? जिल्ह्याचे लक्ष

अमृता चौगुले

यवत : दीपक देशमुख

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यांतर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून एकमेव निवडून आलेले भाजपचे दौंड चे आमदार राहुल कुल यांना नवीन भाजप सरकार शरद पवार आणि अजित पवार यांचा राजकिय वारू रोखण्यासाठी मंत्रिपदाची 'पॉवर' देणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे

भाजप नेते देवेंद्र फडणवीस याचे विश्वसू सहकारी म्हणून आमदार राहुल कुल हे ओळखले जातात. आमदार राहुल कुल आणि दौंड तालुक्यातील जनता यांना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभेत 'कुल यांना आमदार करा मी त्यांना मंत्री करतो' असा शब्द होता परंतु त्यानंतर मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्याने कुल समर्थक नाराज झाले होते परंतु आता राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येत असल्याने कुल समर्थकांना मंत्री पदाची आस लागली आहे
शिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपचे एकमेव आमदार म्हणून राहुल कुल निवडून आले आहेत

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप कडुन कोण निवडणूक लढविणार अशी चाचपणी सुरू असताना ती जबाबदारी आमदार राहुल कुल यांनी घेत आपल्या पत्नी कांचन कुल यांना लोकसभा निवडणुकीत भाजप कडून उभे करत सुळे यांना तगडे आव्हान दिले होते. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला तरी कांचन कुल यांनी लोकसभा निवडणुकीत पवार कुटूंबियांना अक्षरशः बारामती लोकसभा निवडणुकीत 'होम ग्राऊंड'वर जेरीस आणले होते
निवडणूक लक्षवेधी करण्यात कांचन कुल आणि भाजप यशस्वी ठरला होता त्यामुळे त्यांच्या या लढाईचे भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांनी कौतुक केले होते.

लोकसभा विरोधात लढविल्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी राहुल कुल यांना पराभूत करण्यासाठी विशेष रणनीती तयार केली होती परंतु कुल यांनी निसटता विजय मिळवत भाजप मधील सर्वानाच आश्चर्य चा धक्का दिला होता कारण शरद पवार यांच्या ऐतिहासिक सातारा सभेत जिल्ह्यातील सर्वच भाजप उमेदवारांना आपला पराभव स्वीकारावा लागला असताना कुल हे मात्र अपवाद ठरले

1990 पासून पाच वर्षाचा अपवाद वगळता कुल कुटूंबीय दौंड तालुक्याचे प्रतिनिधित्व विधानसभेत करत आहे यात स्वर्गीय आमदार सुभाष कुल यांनी 1990 साली अपक्ष निवडून आल्यानंतर शरद पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी अपक्ष आमदारांची मते आवश्यक असताना सुभाष कुल यांनी 11अपक्ष आमदारांचा गट तयार करत शरद पवार यांना पाठींबा दिला त्याच वेळी सुभाष कुल यांच्या रूपाने दौंड तालुक्यला लाल दिवा मिळेल अशी अपेक्षा होती परंतु सुभाष कुल यांनी मनाचा मोठेपणा दाखवत अपक्ष गटातील सुभाष देशमुख यांना मंत्रिपद देऊ केले होते सुभाष कुल हे मितभाषी आणि हुशार आमदार म्हणून राज्यभर ओळखले जात त्यांनतर देखील ते दोनदा विधानसभेत निवडणूक गेले त्यांच्या आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर रंजना कुल दोनदा विधानसभेत निवडणूक आल्या त्यानंतर मात्र एकदा राहुल कुल यांचा पराभव करत रमेश थोरात विधानसभेत गेले.

2014 साली विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ची साथ सोडत भाजप च्या घटक पक्षाकडून म्हणजे रासप कडून 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली आणि यात ते विजयी झाले यावेळी रासप चे नेते महादेव जानकर यांनी कुल यांना मंत्री पदाचा शब्द दिला होता परंतु तो पाळला गेला नाही

2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल आणि दौंडकरांना मंत्री करण्याचा शब्द दिला परंतु राज्यात त्यांचे सरकार आले नाही आता नव्याने फडणवीस सरकार राज्यात कारभार पाहणार असून
कुल यांना मंत्री पद मिळते का तर पाहावं लागणार आहे

आमदार राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक मधील आमदार म्हणून ओळखले जातात नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत फडणवीस यांनी त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली होती ती त्यांनी पार देखील पाडली आहे त्यानंतर शिंदे गटाने केलेल्या बंडला देवेंद्र फडणवीस यांचे छुपे सहकार्य केले आहे यात देखील कुल यांचा वाटा मोठा आहे

ग्रामीण चेहरा
पुणे शहरा पुरता मर्यादित असणारा भाजप पक्ष आता ग्रामीण भागात पसरत असून राहुल कुल यांची आमदारकी हा त्याचच एक भाग आहेत कुल यांना मंत्री पद दिल्यास ग्रामीण भागात भाजप वेगळी ओळख निर्माण करू शकतो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT