पूढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा संघ दहा महिन्यांनंतर आज भारताविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू झाला. ( Asia Cup 2022 ) या सामन्यात पाकिस्तान संघ काळीपट्टी बांधून मैदानात उतरला आहे.
पाकिस्तानमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेकडाे नागरिक मृत्यूमूखी पडले आहेत. पुरग्रस्तांसोबत आपण आहोत, असा संदेश देण्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू दंडाला काळीपट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. पाकिस्तानच्या आपत्कालीन व्यवथापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत ११९ जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात पुराने अक्षरश: थैमान घातले आहे. पुरामुळे खैबर पख्तुनख्वा या भागात नागरिकांची घरं तसेच बँका वाहून गेल्या आहेत. तर बलुचिस्तानचा पाकिस्तानशी संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच कारणामुळे पूरग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी तसेच अशा परिस्थितीत पूर्ण पाकिस्तान तुमच्यासोबत आहे, हा संदेश देण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू भारताविरोधातील सामन्यात दंडाला काळीपट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.
दहा महिन्यांपूर्वी टी-२० वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-२० विश्वचषकातील पराभवाचा बदला घ्यायचा आहे आणि आशिया चषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सहा वर्षांची विजयी मोहीम सुरू ठेवायची आहे. भारताने २०१६ च्या आशिया कपमध्ये आणि २०१८ मध्ये दोन वेळा पाकिस्तानचा पराभव केला होता.
हेही वाचा :