Latest

Parineeti Chopra : परिणीतीने जीवनसाथी म्‍हणून निवडलेले राघव चड्ढा कोण आहेत?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) आणि आपचे खासदार राघव चड्ढा दोघेजण लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याबाबतची माहिती आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी नुकतेच टविटरवर दिली आहे. एका वृत्तानुसार दोन्ही कुटूबियांकडून लग्नाची बोलणी सुरू असल्याची माहिती मिळतेय. मात्र, परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या कुटूबियांकडून या लग्नाची अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान परिणीतीसोबत डेट करत असणारे खासदार राघव चड्ढा कोण आहेत हे जाणून घेवूयात..

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. परिणीतीच्या इन्स्टाग्रामवरील फोटोत तिच्यासोबत आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा दिसले आणि दोघांच्यात डेटिंगच्या चर्चा रंगू लागल्या. याशिवाय दोघेजण विमानतळ, एका पार्टीत आणि डिनर डेटवर दिसल्याने सोशल मीडियावर याच्या रिलेशनशीपबद्दल चर्चा पसरू लागल्या.

दरम्यान राघव चढ्ढाने दिलेल्या मुलाखतीत 'परिणीती चोप्राबद्दल मला प्रश्न विचारू नका. तर राजकारणावर प्रश्न विचारा असे' त्यांनी म्हटले होतं. तर दुसरीकडे परिणीती राघव चड्डा कॉलेजचा मित्र असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांच्या लग्नाची चर्चा पसरली आहे. मात्र, दोन्ही कुटूबियांकडून या लग्नाची अधिकृत माहिती मिळालेलली नाही.

कोण आहेत राघव चड्ढा?

राघव चड्ढा यांनी दिल्ली विद्यापीठातून B.com ची पदवी घेतली. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेऊन चार्टर्ड अकाऊंटचे शिक्षण घेतले आहे. राघव चड्ढा हे २०१२ पासून आम आदमी पार्टीचे नेते आहेत. सुरुवातीच्या काळात सर्वात तरुण प्रवक्ते म्हणून त्याची ओळख होती. नंतर ते २०१५ मध्ये पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त झाली. यानंतर २०२० मध्ये राघव यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत राजिंदर नगर मतदार संघातून विजय मिळवला. गेल्या वर्षी ते राज्यसभेवर निवडून आले आणि देशातील सर्वात तरुण खासदार ठरले.

परिणीती चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची 'ऊंचाई' या चित्रपटात दिसली होती. याशिवाय आगामी 'चमकीला' आणि 'कॅप्सूल गिल' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT