White pumpkin  
Latest

White pumpkin : पांढरा भोपळा आरोग्यासाठी गुणकारी!

Arun Patil

नवी दिल्ली : हो, भोपळा पांढराही (White pumpkin) असतो. काळे, जांभळे व पिवळे गाजरही असते तस्सेच! हा पांढरा भोपळाही आरोग्यासाठी गुणकारी असतो असे आहार तज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा पांढर्‍या भोपळ्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियमसारखी अनेक खनिजे आणि व्हिटॅमिन ए, सी, ई सारखी जीवनसत्त्वे असतात. याव्यतिरिक्त, ते अँटिऑक्सिडंटस्मध्ये देखील समृद्ध आहे.

वजन कमी करण्यासाठी अशा पांढर्‍या भोपळ्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. तसेच यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंटस् श्वसन प्रणालीतील संसर्ग कमी करण्यास फायदेशीर ठरतात. पांढरा भोपळा (White pumpkin) द़ृष्टी सुधारण्यासही मदत करतो. कारण भोपळ्यामधे व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. ज्या लोकांना रातांधळेपणा आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. सांधेदुखीच्या त्रासावरही पांढरा भोपळा लाभदायक आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही पांढरा भोपळा गुणकारी आहे. बदलत्या ऋतूमध्ये सर्दी, खोकला यासारख्या समस्या टाळण्यासाठी पांढर्‍या भोपळ्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

पांढरा भोपळा (White pumpkin) तुमची द़ृष्टी सुधारण्यासही मदत करतो. कारण भोपळ्यामधे व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. ज्या लोकांना रातांधळेपणा आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. सांधेदुखीच्या त्रासावरही पांढरा भोपळा फायदेशीर आहे. सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी रोज सकाळी एक ग्लास भोपळ्याचा रस प्या. यामुळे काही काळातच सांधेदुखीपासून आराम मिळेल. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही पांढरा भोपळा खूप फायदेशीर आहे. बदलत्या ऋतूमध्ये सर्दी, खोकला यासारख्या समस्या टाळण्यासाठी पांढर्‍या भोपळ्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT