Latest

Hupari crime : भांडण अशी की… पोलिस अधिकार्‍यालाच आली चक्‍कर!

backup backup

हुपरी ; पुढारी वृत्तसेवा :  येथे जागेच्या मागणीवरून आज पुन्हा जोरदार वाद झाला.  एका गटाने झोपड्या पाडून टाकल्याचा आरोप करण्यात आला.  या निषेधार्थ दोन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले.  त्यामुळे माेठी आरडाओरड झाली. या प्रचंड गाेधळामुळे  सहायक पाेलिस निरीक्षक पंकज गिरी यांना चक्‍कर आली. (Hupari crime) पोलिस आणि आंदोलनकर्त्यांचा जोरदार आरडाओरडा आणि बघून घेण्याची भाषा यामूळे वातावरण तणावपूर्ण बनले. गिरी यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले तर त्या दोन महिलाना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हुपरी  हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर २८८ मधील गट नंबर ९२५/८अ ही जमीन समस्त चर्मकार समाज दिली आहे. मात्र याचा कब्जा मिळावा म्हणून गेल्या सोमवारपासून उपोषण सुरू आहे.  आंदोलनकर्त्यानी या जागेवर झोपड्या घातल्यामुळे चर्मकार समाजाच्या दुसऱ्या गटाने त्याला विरोध केला. त्यामुळे जोरदार मारामारी दगडफेक झाली.

 याप्रकरणी ८० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  आंदोलक व दुसरा गट या जागेवर तीन दिवस समोरासमोर ठाण मांडून बसल्याने तणावपुर्ण वातावरण बनले होते.

Hupari crime : दोन महिलांनी आंगावर डिझेल ओतून घेतले

आपण घातलेल्या झोपडय़ा पाडण्‍यात आल्‍या. येथे असणारे फोटो फोडून अपमान करण्‍यात आला, असा आरोप आंदोलनकर्त्यानी केला. याच दरम्यान दोन महिलांनी अंगावर डिझेल ओतून घेतले. त्यातच सपोनि पंकज गिरी तेथे होते त्यांनी महिलांना राेखण्व‍याचा प्रयत्न केला. आंदोलक आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत होते. दरम्यान सपोनि गिरी यांना चक्कर आल्याने खाली पडले. त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर उपअधीक्षक बी बी महामुनी यांच्यासह जयसिंगपूर, कुरुंदवाड येथील पोलिस निरीक्षकांसह कृती दल येथे दाखल झाले.

पोलिसांनी एकतर्फी फिर्याद घेऊन गुन्हे दाखल केले आहेत, असा आराेप करत आमची फिर्याद घ्या, यावर आंदोलक ठाम होते. याठिकाणी तणावपूर्ण वातावरण असून, पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT