Latest

WhatsApp मध्ये जबरा बदल ! हळूच स्क्रीनशॉट घेणाऱ्यांची चोरी कशी पकडली जाणार ते जाणून घ्या

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क

WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. अलीकडेच WhatsApp युझर्ससाठी नवीन सुरक्षा अपडेट आणले गेले आहे. WhatsApp चे नवीन प्रायव्हसी फिचर युझर्सच्या चॅटसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि स्टेटस, प्रोफाइल फोटो आणि बरेच काही हाईड करण्याच्या संबंधाने आहे. WhatsApp ने युझर्ससाठी एक नवीन प्रायव्हसी फिचर्स आणले आहे. या नवीन फीचरद्वारे, अनोळखी WhatsApp कॉन्टॅक्ट, ज्याच्याशी कधीही चॅट केले गेले नाही, त्याला लास्ट सीन आणि ऑनलाईन स्टेटस दिसणार नाही.

आजच्या डिजिटल युगात गोपनीयतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये युजर्सच्या खासगी डेटाचा भंग होऊन त्याचा गैरवापर झाला आहे. हे लक्षात घेऊन WhatsApp वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत असते, जेणेकरून यूजर्सचा खाजगी डेटा सुरक्षित आणि सुरक्षित ठेवता येईल.

काही रिपोर्ट्सनुसार WhatsApp प्रायव्हसीशी संबंधित एका खास फीचरवर काम करत आहे. या स्पेशल फीचर अंतर्गत, जर दोन यूजर्स एकमेकांशी बोलत असतील आणि यादरम्यान एका यूजरने चॅटचा स्क्रीन शॉट घेतला तर WhatsApp लगेच दुसऱ्या यूजरला नोटिफिकेशन पाठवेल. अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला त्याची माहिती होईल. भविष्यात हे फिचर रिलीज झाल्यास जगभरातील करोडो लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

कसा होणार बदल सविस्तर जाणून घेऊया

मीडिया रिपोर्ट्सनुसार, WhatsApp ने या फीचरवर काम सुरू केले आहे. हे फीचर आणण्यामागचा उद्देश युजर्सच्या गोपनीयतेचे रक्षण करणे हा आहे. फीचर अंतर्गत, इतर कोणीतरी चॅटचा स्क्रीनशॉट घेताच. WhatsApp ही माहिती लगेचच पहिल्या यूजरला नोटिफिकेशनच्या स्वरूपात देईल.

जेव्हा युझर्स WhatsApp वर पाठवलेला संदेश वाचतो. त्यादरम्यान संदेशाच्या खाली डबल ब्लू टिक दिसायला लागते. त्याचवेळी, हे नवीन फीचर आल्यानंतर, दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेताच मेसेजच्या तळाशी तीन टिक्स दिसतील.

हे फिचर अद्याप रिलीज करण्यात आलेले नाही. यावर काम सुरू आहे. लवकरच या नवीन फीचरची चाचणी देखील सुरू होऊ शकते. एकदा चाचणी यशस्वी झाल्यानंतर, ते नवीन फिचर्स म्हणून प्रसिद्ध केले जाईल. माहितीसाठी कंपनीने याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सद्वारे या फीचरबद्दल अंदाज लावले जात आहेत.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT