WhatsApp Secret Code Feature 
Latest

WhatsApp Secret Code Feature: आता स्क्रीन चॅटींग होणार सुरक्षित! व्हॉट्सॲपवर येणार भन्नाट फिचर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: तुम्हीही मोबाइलऐवजी व्हॉट्सॲप वेब व्हर्जनवर अधिक वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी व्हॉट्सॲप वेब व्हर्जनसाठी नवीन अपडेट जारी केली आहे. यामुळे व्हॉट्सॲप वेब आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे. व्हॉट्सॲप वेबवर कंपनीने 'सीक्रेट कोड' हे नवीन फिचर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भातील वृत्त 'NDTV-गॅझेट'ने दिले आहे. (WhatsApp Secret Code Feature)

WhatsApp Web वर 'सिक्रेट कोड' लवकरच उपलब्ध

साधारणपणे व्हॉट्सॲप वेब व्हर्जन मोबाईल व्हर्जनप्रमाणे लॉक केलेले नसते. व्हॉट्सॲप वेब व्हर्जन फक्त लॅपटॉपच्या पासवर्डने लॉक केले जाते, मात्र नवीन अपडेटनंतर व्हॉट्सॲप वेब व्हर्जनला सिक्रेट कोडद्वारे लॉक करता येणार आहे. चॅट लॉक फीचरचा मोठा फायदा म्हणजे व्हॉट्सॲपचे वेब व्हर्जन देखील ॲपसारखे सुरक्षित असेल. लॅपटॉप कुणाच्या हातात गेला तरी तो तुमच्या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये प्रवेश करू शकणार नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी वेबवर प्रवेश करायचा असेल तेव्हा तुम्हाला पिन प्रविष्ट करावा लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (WhatsApp Secret Code Feature)

असा करा WhatsApp Web वर 'सिक्रेट कोड' सुरू

तुम्हालाही व्हॉट्सॲप वेबचे हे सीक्रेट कोड फीचर चालू करायचे असेल, तर आधी तुमचे व्हॉट्सॲप अपडेट करा. यानंतर सेटिंगमध्ये (Settings) जा आणि त्यानंतर प्रायव्हसी (Privacy) ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर, तुम्हाला तळाशी स्क्रीन लॉक (Screen lock) पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि नवीन टॅब उघडल्यानंतर टिकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ६ अंकी गुप्त कोड टाकावा लागेल. कोडची पुष्टी करा आणि ओके क्लिक करा. यानंतर, जेव्हाही तुम्ही व्हॉट्सॲप वेब व्हर्जनवर जाल तेव्हा तुम्हाला हा कोड टाकावा लागेल. (Whatsapp Secret Code Feature)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT