Latest

Screenshot Block : Whatsappचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सअपने आपल्या युजर्संच्या सुरक्षेचा विचार करत Screenshot Block हे नवे फिचर आणले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे फिचर खूपच चर्चेत होते. त्यामुळे आता युजर्सची प्रतिक्षा संपली आहे. फोटो आणि व्हिडीओसाठीचे स्क्रीनशॉट ब्लॉक करणारे हे नवे फीचर सुरू करण्यात आले आहे. कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर याआधीच हे फिचर सुरू केले आहे. सध्या ही सुविधा फक्त बिटा युजर्संना मिळत आहे. या नव्या फिचरच्या मदतीने View Once या पर्यायाने एकदाच पाहण्यासाठी पाठवलेल्या व्हिडिओ आणि फोटोचे स्क्रीनशॉट आता काढता येणार नाहीत. याचविषयी जाणून घेऊया अधिक माहिती.

WABetainfo च्या रिपोर्टनूसार Meta च्या मेसेजिंग (Messaging) प्लॅटफॉर्मवर काही चाचण्या या फिचर्सविषयी घेण्यात आल्या. ऑगस्टमध्ये मार्क झुकेरबर्ग यांनी ३ नव्या सुरक्षाविषयक फिचर्सची घोषणा केली. यामध्ये Online status, past participants आणि Screenshot blocking चा समावेश आहे.

कसे काम करेल हे नवे फिचर?

कंपनीच्या या फिचर्सच्या रिपोर्टनूसार, एखादा युजर्स स्क्रिनशॉटसाठी कोणत्याही अन्य थर्ड पार्टी कंपनीचा वापर करून स्क्रिनशॉट (Screenshot) घेत असेल तर View Once ही सुविधा स्क्रिनशॉट ब्लॉक (Screenshot Block) करेल. View Once पर्यायाचा वापर करून पाठवलेले फोटो आणि व्हिडिओचे स्क्रिनशॉट घेणाऱ्या युजर्सला एक एरर मेसेज (Error Message) दिसेल. Can't Take screenshot Due to Security Policy अशा आशयाचा तो मेसेज असेल.

जर हे फिचर युजर्सच्या व्हॉट्सअप अकाऊंटला चालू केले असेल तर, स्क्रिनशॉट घेणाऱ्या व्यक्तीला स्क्रिनशॉट ब्लॉक करत यासाठी परवानगी देणार नाही. हे फिचर फक्त व्हिडिओ आणि फोटोसाठीच आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT