Latest

WhatsApp ने आणले भन्नाट ‘Chat Lock’ प्रायव्हसी फिचर; काय आहे त्यात खास

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : मेटा ही व्हॉट्सॲपची पेरेंटींग कंपनी आहे. व्हॉट्सॲप या इन्स्टंट मेसेजिंग कंपनीने यूजर्सची समस्या लक्षात घेत, एक भन्नाट फिचर (WhatsApp feature) आणले आहे. या फिचरमुळे युजर्संना त्यांची प्रायव्हसी जपता येणार आहे. WhatsApp ने Chat Lock हे प्रायव्हसी फिचर आणत असल्याचे त्यांच्या ट्विटरवरून स्पष्ट केले आहे.

whatsapp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. Whatsapp गेल्या काही दिवसांच्या वापरासाठी नववीन अपडेट्स आणि फीचर्स लॉन्च करत आहे. व्हॉट्सॲपने नुकतेच Chat Lock हे फिचर आणत असल्याचे जाहीर केले आहे. या नवीन फिचरमुळे युजर्संना चॅटिंगमध्ये वैशिष्ट गोपनीयता बाळगता येणार आहे. युजर्स या फिचरचा वापर करून त्यांचे खासगी आणि वैयक्तिक संभाषणे पासवर्डसह लॉक करू शकणार आहेत. यामुळे व्हॉट्सॲपमधील (WhatsApp feature) तुमचे वैयक्तिक मेसेज कोणीही वाचू शकणार नाही. या प्रायव्हसी फिचरमुळे तुम्ही तुमचा फोन कोणाच्याही हातात निसंकोचपणे देऊ शकता, असे कंपनीने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या फीचरमध्ये (WhatsApp feature) कंपनी आणखीअपडेट्स आणू शकते. हे फिचर लोकांची प्रायव्हसी आणखी सुरक्षित करण्यासाठी रोलआऊट करण्यात आले आहे. तसेच हे फिचर iOS आणि Android या दोन्ही यूजर्संसाठी देण्यात आल्याची माहिती  कंपनीने दिली आहे.

पुढील स्टेप्स फॉलो करा अन् 'Chat Lock' फिचर अनुभवा

  • प्रथम व्हॉट्सॲप अपडेट करा.
  • WhatsApp ओपन करा, ज्या व्यक्ती किंवा ग्रुपचे चॅट तुम्हाल लॉक करायचे आहे त्यावर क्लिक करा.
  • ज्या व्यक्ती किंवा ग्रुपचे चॅट लॉक करायचे आहेत, त्याच्या प्रोफाइल चित्रावर टॅप करा.
  • अदृश्य मेसेज मेन्यूच्या खालच्या बाजूला तुम्हाला 'chat lock' हा ऑप्शन दिसेल, त्यावर पुन्हा क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये चॅट लॉक वैशिष्ट्य सक्षम होईल.
  • पुढे तुमचा फोन पासवर्ड किंवा बायोमेट्रिक्स वापरून हे फिचर तुमच्या व्हॉट्सॲपवर कार्यरत होईल .

लॉक केलेल्या चॅट्समध्ये असा करा प्रवेश

  • लॉक केलेल्या चॅट्समध्ये प्रवेश करण्यासाठी WhatsApp मुख्यपृष्ठावर खाली स्वाइप करा.
  • यानंतर तुम्ही लॉक केलेल्या चॅट लॉकची लिस्ट मिळेल.
  • पुढे तुम्हाला ज्या चॅट लॉक केलेल्या व्यक्ती किंवा ग्रुपच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये प्रवेश करायचा आहे. त्यावर तुम्ही जाऊ शकता.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT