पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्स ॲपने (WhatsApp) शनिवारी नोव्हेंबर महिन्याचा आपले मासिक अहवाल सादर केला आहे. यामध्ये त्यांनी नवीन 'आयटी' कायद्याचे पालन केल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये म्हटलं आहे की, भारतातील १७,५९,००० व्हॉट्स अकाऊंटवर (WhatsApp) बंदी घालण्यात आली आहे.
व्हॉट्स ॲपने एक निवेदन स्पष्ट केले आहे की, आयटी नियम 2021 नुसार आम्ही नोव्हेंबर महिन्यासाठी आमचा सहावा मासिक अहवाल प्रकाशित केला आहे. हा अहवाल वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि व्हॉट्सॲपद्वारे घेतलेल्या संबंधित कृती तसेच आमच्या प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तनाचा सामना करण्यासाठी व्हॉट्सॲपच्या स्वतःच्या प्रतिबंधात्मक कृतींचा तपशील देतो.
व्हॉट्स ॲपने आपल्या अहवालात म्हटले आहे की, नोव्हेंबरमध्ये भारतातील १७,५९,००० व्हॉट्स अकाऊंटवर (WhatsApp) बंदी घालण्यात आली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अकाउंट सपोर्ट (149), बॅन अपील (357), अन्य सपोर्ट (21), उत्पादन समर्थन (48) आणि सुरक्षितता (27) संदर्भात एकूण 602 वापरकर्त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. निर्बंध स्वयंचलित किंवा बल्क मेसेजिंग (स्पॅम) च्या अनधिकृत वापरामुळे ही कारवाई केल्याचेही या अहवालात म्हटलं आहे.
95 टक्क्यांहून अधिक निर्बंध स्वयंचलित किंवा बल्क मेसेजिंग (स्पॅम) च्या अनधिकृत वापरामुळे आहेत. कारवाई करणे म्हणजे एकतर अकाऊंट ब्लॉक करणे किंवा तक्रारीच्या परिणामीपूर्वी प्रतिबंधित केलेले अकाऊंट पन्हा सुरु करणे. तुमचे अकाऊंट सुरक्षित ठेवायचे असेल तर या सर्व बेकायदेशीर कृती टाळल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
एंड-टू-एंड एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवेद्वारे आम्ही मेसेजिंग सेवेचा गैरवापर रोखण्यात मदत करतो. आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा सायंटिस्ट, तज्ञ आणि प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.
हेही वाचलं का?