Latest

Jitendra Awhad Daughter : एका बापाने अशावेळी काय बोलायचं? मुलीच्या लग्नानंतर जितेंद्र आव्हाड झाले भावुक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचे (Jitendra Awhad Daughter) आज रजिस्टर पद्धतीने लग्न संपन्न झाले. मंत्री असूनही त्यांनी कोणताही गाजावाजा न करता आपल्या मुलीचे लग्न अगदी साधेपणाने करून समाजात एक आदर्श घालून दिला.

आव्हाड यांची मुलगी नताशा हिचा काही दिवसांपूर्वी घरगुती पद्धतीने गोंधळ घालण्यात आला होता. भावूक होत त्यांनी ते फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

हल्ली श्रीमंत वर्गामध्ये मोठा बँडबाजा, वराता, प्राईम लोकेशन, आकर्षक सजावट करत लाखो रूपयांची उधळन करून लग्न करण्याकडे कल दिसून येतो. एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना दुसरीकडे, असा कोणताही गाजावाजा न करता आपल्या मुलीचा अत्यंत साध्या पद्धतीने, रजिस्टर मॅरेज करून समाजात आदर्श निर्माण करण्याचे काम राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. राजकीय नेत्यांच्या मुलांची लग्नं म्हटलं की, महागातल्या लग्न पत्रिका, पै पाहुण्यांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, असा राजेशाही थाट बघायला मिळतो. तर त्यांच्या लग्नसमारंभाला मंत्र्यांपासून ते उद्योजकांचीही गर्दी पहायला मिळते. मात्र, जितेंद्र आव्हाड हे त्याला अपवाद ठरले. (Jitendra Awhad Daughter)

जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाड हिचा विवाह व्यावसायिक एलन पटेल याच्याशी रजिस्टर पद्धतीने पार पडला.
या समारंभानंतर भावुक होत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एका बापाने अशावेळी काय बोलायचं? "कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला, तरी ते होत नाही. याचे कारण म्हणजे घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार.यामुळं घरातील घरपण गेल्यासारखं असेल," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT