पुढारी ऑनलाईन ; अंमलबजावणी संचालनालयाने टीएमसी नेते शंकर आध्ये यांच्यावर आज अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. दरम्यान रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घरी धाड टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर संतप्त जमावाने हल्ला केला. यावेळी पथकातील गाड्यांचीही ताेडफाेड करण्यात आली.
पश्चिम बंगालमध्ये ईडीने रेशन घोटाळ्याप्रकरणी छापासत्र सुरू केले आहे. या प्रकरणी ईडीने शुक्रवारी रात्री उशीरा तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आध्ये यांना अटक केली. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्यावर कारवाई केली. दरम्यान ईडीने त्यांना कोलकाता येथील ईडीच्या मुख्यालयात आणले असून, आध्ये यांची चौकशी सुरू आहे. ईडीने या कारवाईत रोख रकमेसह महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
हेही वाचा :