W.Bengal Railway Accident 
Latest

West Bengal Train Accident : प. बंगालमधील बांकुरा येथील ओंडा रेल्वे स्थानकाजवळ दोन मालगाड्यांचा भीषण अपघात (पाहा व्हिडिओ)

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : West Bengal Train Accident : पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे रविवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. येथील ओंडा रेल्वे स्थानकाजवळ दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या. ही टक्कर इतकी भीषण होती की दोन्ही मालगाड्यांचे इंजिन केवळ रुळावरून घसरले नाही तर जागीच उलटले. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये रेल्वे ट्रॅक आणि मालगाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे.

या घटनेनंतर खरगपूर-बांकुरा-आद्रा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे. या घटनेत किती नुकसान व जीवितहानी झाली याबाबतची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही.

अपघाताचे कारण आणि दोन्ही गाड्या एकमेकांना कशा धडकल्या हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे सुरक्षा अधिकारी दिबाकर माळी यांनी सांगितले. दृश्यानुसार, या अपघातात मालगाडीचे अनेक वॅगन्स आणि इंजिन रुळावरून घसरले.

ओडिशातील बालासोर येथे घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा हा भीषण रेल्वे अपघात झाल्याने सर्वत्र खबळबळ उडाली आहे. सुदैवाने या दोन्ही मालगाड्या असल्याने यामध्ये मोठ्या जीवितहानीला सामोरे जावे लागणार नाही. मात्र, असे असले तरी या अपघाताने रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT