पुढारी ऑनलाईन : आज देशभरात सौभाग्यवती स्त्रिया करवा चौथची तिथी उत्साहात साजरी करत आहेत. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. या दिवशी एक दिवस अन्न पाण्याशिवाय राहून स्त्रिया संध्याकाळी हा उपवास सोडतात. पण उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मात्र भलतीच घटना घडली आहे. एक महिला आदल्या दिवसापर्यंत पतीसोबत करवा चौथची शॉपिंग करत होती. ही खरेदी झाल्यानंतर मात्र तिने पतीच्या हातावर तुरी देत बहिणीच्या पतीसोबत पळ काढला आहे.
या महिलेच्या पतीने मात्र पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत साडूवर आरोप केला आहे. विशेष म्हणजे या महिलेला 18 महिन्यांचं बाळही आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार पत्नीसोबत पाळलेली व्यक्ती तिला वाईट कामांसाठीही भाग पाडू शकतो. ही महिला जाताना आपल्यासोबत 15 हजार आणि काही दागिनेही घेऊन गेली आहे. पती कामावर गेल्यावर ही महिला आपल्या प्रियकरासोबत गेली असल्याचं समोर येत आहे.
हेही वाचा :