अमित ठाकरे,www.pudhari.news 
Latest

अमित ठाकरे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत, आजपासून चार दिवस जिल्हा दौरा

गणेश सोनवणे
इगतपुरी/नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक बांधणीकरिता 'महासंवाद यात्रे'निमित्त आज शनिवार (दि. ६) पासून पुढील चार दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान अमित ठाकरे यांचे जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणा-या इगतपुरी येथे मनसेच्यावतीने ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

यावेळी एसएमबीटी महाविद्यालय, केपीजी महाविद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. अमित ठाकरे यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या अडी अडचणींविषयी विचारणा केली व मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष संदीप कीर्वे, तालुका अध्यक्ष शत्रूघ्न भागडे, मनविसेना गणेश उगले, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रताप जाखेरे, जिल्हा संघटक मनोज गोवर्धने, मुलचंद भगत, भोलेनाथ चव्हाण, इगतपुरी शहाराध्यक्ष सुमित बोधक, घोटी शहराध्यक्ष सत्यम काळे, इगतपुरी शहर उपाध्यक्ष राज जावरे, अमित कीर्वे, निलेश बुधवारे, नागेश गायकर, यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाकरे ६ ऑगस्ट राेजी इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यातील महाविद्यालयांना भेटी देतील. त्यानंतर दि. ७ ऑगस्टला निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव व चांदवड, ८ ऑगस्टला सटाणा, देवळा, कळवण, दिंडोरी, हरसूल, सुरगाणा, त्र्यंबक तालुका, तर दि. ९ ऑगस्टला नाशिक शहरातील माेठ्या महाविद्यालयांना भेटी देणार आहेत. या भेटीत प्रत्येक विद्यालयाला २० मिनिटे दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांचे राजकारणाविषयीचे मते आणि त्यानंतर प्रत्येक ग्रुपमधून तीन जणांशी संवाद व छायाचित्रण असे स्वरूप असेल. एकूणच यानिमित्ताने मनसेकडे तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न असेल.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT