मानवी मेंदू म्हणजे केवळ विचार करणारी किंवा निर्णय घेणारी एक मशीन नाही. तर दर सेकंदाला असे काही आश्चर्यकारक काम करतो.
तुमचा मेंदू तुम्हाला न सांगता कोणती ७ आश्चर्यकारक कामं करतो ते जाणून घ्या.
वेदना त्वरित 'सुन्न' करतो : जेव्हा तुम्हाला मोठी दुखापत होते, तेव्हा मेंदू त्वरित एंडोर्फिन्स नावाचे रसायन सोडतो. हे नैसर्गिक पेनकिलर काही काळासाठी वेदना कमी करतात. जेणेकरून तुम्ही , प्रतिकार करू शकाल किंवा स्वतःला सुरक्षित ठिकाणी पोहोचवू शकाल.
संकट किंवा जीवघेण्या परिस्थितीत, मेंदू अतिशय जलद गतीने माहितीवर प्रक्रिया करतो. त्यामुळे तुम्हाला आजूबाजूला सगळं स्लो मोशनमध्ये (मंद गतीत) होत असल्याचा भास होतो. प्रत्यक्षात ती मंद गती नसते, तर तुमचा मेंदू त्या क्षणावर झूम करतो, जेणेकरून तुम्ही उत्तम प्रतिक्रिया देऊ शकता.
डोळ्याची उघडझाप करताना एका सेकंदापेक्षा कमी वेळेसाठी तुमच्या डोळ्यांसमोर अंधार येतो. पण, मेंदू तात्काळ ती पोकळी भरून काढतो. त्यामुळे तुम्हाला कधीच जाणीव होत नाही की तुम्ही दर मिनिटाला अनेकवेळा 'आंधळे' होत आहात.
गाढ झोपेत असताना, तुमचा मेंदू तुमच्या स्नायूंना लॉक करतो. याला स्लीप पॅरालाईसिस सारखी स्थिती मानली जाते, ज्यात शरीर हलू शकत नाही. हे यासाठी होतं की तुम्ही स्वप्नातल्या हालचाली प्रत्यक्षात करू नयेत. यामुळेच झोपेत तुम्ही धावत, पडत किंवा लढत नाही.
'मानसिक आघात' मेंदू दाबून ठेवतो : खूप वेदनादायक किंवा भयानक अनुभव मेंदू खोलवर दाबून टाकतो. मेंदू त्यांना लॉक करतो कारण तुम्ही मानसिकरित्या कोसळू नये. जोपर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होत नाही, तोपर्यंत मेंदू त्या आठवणी पूर्णपणे समोर येऊ देत नाही. हा एक प्रकारचा स्व-बचाव आहे.
प्राण्यांप्रमाणे माणूसही भीतीचा गंध घेऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती तणावात असते, तेव्हा तिचं शरीर काही विशिष्ट रसायने (केमिकल्स) सोडतं, जे आजूबाजूचे लोक नकळतपणे जाणीव अनुभवतात. म्हणूनच गर्दीत भीती पसरते किंवा घाबरलेल्या व्यक्तीला पाहून तुम्हालाही अस्वस्थ वाटते.
तुमचा मेंदू 'भविष्याचा अंदाज' लावतो : तुम्हाला वाटतं की तुम्ही विचार करून प्रतिक्रिया देता, पण खरं तर मेंदू आधीच अंदाज लावत असतो की पुढे काय होणार आहे. याच कारणामुळे तुम्ही पडणारी वस्तू क्षणार्धात पकडता. जणू काही मेंदूने आधीच 'भविष्य' बघितलं होतं.