पुढारी वृत्तसेवा
राज्यात थंडीची चाहूल लागताच दरवर्षीप्रमाणे यंदाही परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे (Migratory Birds) आगमन झाले आहे.
विविध देशांतून हजारो मैलांचा प्रवास करून आलेले हे हिवाळी पाहुणे पक्षीप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडच्या डोंगररांगांमध्येही स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यामध्ये आफ्रिकेतील जांभळ्या बगळ्याचाही समावेश आहे.
आफ्रिकेतील जांभळा बगळा स्थलांतरानंतर महाराष्ट्रातील पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याजवळील परिसरात सामान्यपणे आढळतो.
जांभळ्या बगळ्याच्या अनेक उपप्रजाती आहेत. विशेषत: युरोप आणि उत्तर आशियामध्ये प्रजनन करणारे बगळे हे स्थलांतर करणारे असतात.
स्थलांतरीत पक्षी जांभळा बगळा हा ५ ते ७ दिवसांत दिवस-रात्र 3,500 ते 4,000 किलोमीटर लांब अंतर पार करू शकतो.
स्थलांतरादरम्यान ते मोठ्या थव्यात प्रवास करतात.
ही प्रजाती आफ्रिका, मध्य आणि दक्षिण युरोप तसेच दक्षिण आणि पूर्व आशिया या प्रदेशांत प्रजनन करते.
हा स्थलांतरीत पक्षी दलदलीच्या प्रदेशात आणि उंच गवत/ऊस किंवा लव्हाळ्याच्या झाडीत लपून राहणे पसंत करतो. त्यामुळे तो सहसा उघड्या पाण्यापेक्षा अशा झाडीजवळ जास्त दिसतो.