Morning Stroke Symptoms 
Web Stories

Wake Up Stroke | रात्री झोपताना सर्व काही ठीक; सकाळी उठताच स्ट्रोकचा धोका! 'वेक-अप स्ट्रोक'ची ही लक्षणे ओळखा

पुढारी वृत्तसेवा

स्ट्रोक हा एक गंभीर आजार आहे. मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्यास किंवा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी फुटल्यास स्ट्रोक येतो. त्यामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होते

काही वेळा व्यक्ती झोपेत असतानाही स्ट्रोकचा झटका येऊ शकतो आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्याची लक्षणे जाणवतात. या प्रकाराला 'वेक-अप स्ट्रोक' (Wake-up Stroke) असे म्हणतात

अशा परिस्थितीत झोपण्यापूर्वी व्यक्तीची प्रकृती सामान्य असते; मात्र सकाळी उठल्यानंतर बोलण्यात, चालण्यात किंवा शरीराच्या एखाद्या भागाची हालचाल करण्यात अडचण जाणवू लागते

स्ट्रोक कोणत्याही वेळी येऊ शकतो. अगदी झोपेत असतानाही त्याचा झटका येण्याची शक्यता असते

मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे स्ट्रोक येतो

काही वेळा झोपेत असताना स्ट्रोक आल्याचे व्यक्तीच्या लक्षातही येत नाही. मात्र, सकाळी उठल्यानंतर शरीरातील बदलांमुळे त्याची जाणीव होते

उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण आणि हृदयाशी संबंधित काही आजार यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो

याशिवाय धूम्रपान, शारीरिक हालचालींचा अभाव आणि चुकीच्या आहाराच्या सवयी यांचाही स्ट्रोकच्या धोक्यात भर पडते

स्ट्रोकची लक्षणे ओळखण्यासाठी FAST ही सोपी आणि महत्त्वाची पद्धत वापरली जाते. चेहरा, हात आणि बोलण्यातील बदल तपासून तातडीने वैद्यकीय मदत घ्या

SCROLL FOR NEXT