पुढारी वृत्तसेवा
दिवाळीच्या काळात एकाच वेळी चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि शंकरपाळे खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज, साखर आणि चरबी जाते एकावेळी थोड्याच प्रमाणात फराळ खावा
चकली, करंजी, शेव, चिरोटे आणि शंकरपाळे यांसारख्या पदार्थांमधून शरीरात मोठ्या प्रमाणात चरबी आणि कॅलरीज जाते, वापरलेले तेल आरोग्यासाठी अधिक घातक ठरू शकते
लाडू, करंजी, अनारसे, शंकरपाळे आणि इतर मिठाईमध्ये साखर, गूळ, तूप आणि मैदा यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळतात
दिवाळीच्या काळात पचनाच्या तक्रारी वाढतात. विशेषतः तळलेले, मसालेदार आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो
दिवाळीच्या धावपळीत अनेकदा पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात
जास्त तेलकट आणि गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच झोपल्यास काही व्यक्तींना अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ जाणवू शकते
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये व्यायामाचा दिनक्रम विस्कळीत होतो. फराळातून मिळणाऱ्या अतिरिक्त कॅलरीजचा विचार करता शारीरिक हालचाल सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे
फराळाचे पदार्थ तयार करताना मैद्याऐवजी गव्हाचे पीठ किंवा इतर पौष्टिक धान्यांचा वापर करा. चिवड्यामध्ये पोहे, भाजलेले शेंगदाणे, डाळी आणि कढीपत्त्याचा समावेश करा
लहान मुलांना चटकदार आणि गोड पदार्थ आवडतात. मात्र, त्यांना सतत फराळ खाण्याची सवय लागू देऊ नये. त्यांच्या नियमित आहाराची जागा फराळाने घेऊ देऊ नका