हिवाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे हे काही हर्बल टी तुम्हाला आतून मजबूत करुन निरोगी ठेवतील
आल्यामध्ये असलेले जिंजरॉल पचनक्रिया सुधारते आणि गॅस, अपचनाची समस्या दूर करते. हिवाळ्यात, हा चहा शरीराला नैसर्गिक उष्णता प्रदान करतो आणि त्याचे अँटी-व्हायरल गुणधर्म खोकला आणि सर्दीपासून आराम देतात. आल्याचा चहा जड जेवणानंतर पोटाला शांत करतो.
बडीशेप पाचक एंजाइम सक्रिय करते जे अन्नाचे जलद पचन करण्यास मदत करते. गॅस दूर करते. हिवाळ्यात, सौम्य आणि आरामदायी चहा पोटाला आराम देतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास देखील मदत करतो.
तुळशीमध्ये शक्तिशाली अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत आणि ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि हिवाळ्यातील संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते. घसा, छाती आणि श्वसनसंस्था मोकळे राहते. पचनक्रिया सुरळीत होते आणि आम्लपित्त कमी होते.
पुदिना पोटाच्या स्नायूंना आराम देतो आणि गॅस आणि अपचन दूर करतो. सकाळी होणारी मळमळ, जडपणा आणि पोटफुगी यापासून आराम मिळताे. पुदिन्यामध्ये असलेले मेन्थॉल सर्दी आणि खोकल्यापासून आराम देते, तसेच ताजेपणा आणि मानसिक शांतता प्रदान करते जे पचनासाठी चांगले आहे.
हिवाळा शरीरासाठी आव्हानात्मक असतो थंडीमुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे असे नैसर्गिक औषधी वनस्पतींपासून बनवलेला चहा पोटासाठी हलका असतो. हिवाळ्यातील संसर्गापासून संरक्षण होऊन थंडीमध्ये पचन आणि प्रतिकारशक्तीसाठी हर्बल चहा सर्वात फायदेशीर आहे