Web Stories

Indoor Plants : घरातील हवा शुद्ध करणार्‍या या 7 वनस्‍पतींविषयी जाणून घ्‍या

पुढारी वृत्तसेवा

शहरांमध्ये वायू प्रदूषण एक गंभीर समस्‍या बनली बनले आहे. यावर उपाय म्‍हणून काही इनडोअर वनस्पती घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पूरक ठरतात.

स्पायडर प्लांट ही वनस्पती घरातील हवा स्वच्छ ठेवते, घातक वायू शोषून घेते. याला फार कमी काळजी लागते. पाळीव प्राण्यांसाठीही सुरक्षित आहे.

स्नेक प्लांट कमी प्रकाशात आणि कमी पाण्यावर तग धरू शकते. ती रात्रीच्या वेळीही ऑक्सिजन निर्माण करते.

पीस लिली ही अमोनिया, बेंझिन आणि फॉर्मल्डिहाइड शोषून घेते. तिची पांढरी फुले सौंदर्य वाढवतात.

कोरफड (Aloe Vera) रात्री ऑक्सिजन सोडते. घातक वायू शोषून घेतेच तिचा गर (gel) भाजलेल्या किंवा त्वचेच्या जळजळीवर आराम देऊ शकतो.

बोस्टन फर्न ही वनस्‍पती हवेतील घातक घातक वायू शोषून घेण्यासाठी उत्कृष्ट आहे.

एरेका पाम ही वनस्‍पती कोरड्या हवेत आर्द्रता वाढवते. तिला कमी सूर्यप्रकाश आणि नियमित पाण्याची आवश्यकता असते.

जर्बेरा डेझी हवा शुद्‍ध करतेच. या वनस्‍पतीची सुंदर फुले प्रसन्‍नता वाढवतात.

SCROLL FOR NEXT