पुढारी वृत्तसेवा
परदेशवारी म्हणजे खर्चिक, असे समीकरण आपल्याकडे रुढ झालेले आहे.
तुम्हाला माहिती आहे का, काही देशांमध्ये भारताचा रुपया चलनाची मोठी क्रयशक्ती आहे.
जाणून घेवूया असे सहा देश जेथे भारतीय रुपयाचे मूल्य हे अधिक आहे. हे देश तुम्हाला कमी खर्चात उत्तम पर्यटनाची संधी देतात.
श्रीलंका देशात एक रुपयाचे मूल्य अंदाजे ३.८ LKR एवढे आहे. त्यामुळे परवडणाऱ्या दरातील निवासव्यवस्था आणि सी-फूडची रेलचेल पर्यटकांना अनुभवता येते.
इंडोनेशियात एका भारतीय रुपयाचे मूल्या अंदाजे १९० IDR इतके आहे. भारतीय प्रवाशांसाठी हॉटेल्स, जेवण आणि वाहतूक खर्च वाजवी दरात उपलब्ध आहे.
व्हिएतनाममध्ये भारतीय रुपयाचे मूल्य अंदाजे २९६ VND इतका आहे. या देशातील पर्यटनाचा आनंद भारतीय कमी खर्चात करु शकतात.
कंबोडियात रुपयाचे मूल्य अंदाजे ४९ KHR आहे. या देशाचा इतिहास आणि शांतता पर्यटकांना एक वेगळी अनुभूती देणारा ठरतो.
नेपाळमध्ये एका रुपयाचे मूल्य अंदाजे १.६ NPR आहे. भारताचा शेजारी असणारा या देशात ट्रेकिंग आणि चविष्ट खाद्यपदार्थ मेजवाणी पर्यटक आपल्या बजेटमध्ये घेऊ शकतात.
म्यानमारमध्ये रुपयाचे मूल्य अंदाजे २५ MMK आहे. पर्यटनांना भूरळ घालणारा हा देश भारतीयांच्या खिशाला परवडणारा आहे.