पुणे : संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण राज्य गारठण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी राज्यात जळगावचा पारा राज्यात सर्वात नीचांकी 9.9 अंशांपर्यंत खाली आला. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर व पुणे शहराचा पाराही 10 ते 12 अंशांवर आला. आगामी तीन दिवस राज्यात थंडीची तीव्रता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेले काही दिवस राज्याच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली होती. किमान तापमानाचा पारा 25 ते 22 अंशांवर, तर कमाल तापमानाचा पारा 30 ते 33 अंशांवर गेला होता. संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण सुरू होताच तापमानात वाढ होण्याऐवजी सायंकाळी 7 नंतर राज्य गारठले. सोमवारी दिवसभर कडक उन होते. सायंकाळी शीतलहरी तीव्र झाल्या.
हेही वाचा