डी. के.शिवकुमार  
Latest

DK Shivakumar : आम्ही राजस्थानसह सर्वच राज्य जिंकू : डी के शिवकुमार

अविनाश सुतार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळीत सुरू आहे. यात 'आम्ही राजस्थानसह पाचही राज्य जिंकू,' असा विश्वास कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केला. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. DK Shivakumar
राजस्थानमध्ये काँग्रेसच्या कामगिरीबद्दल बोलताना डी के शिवकुमार म्हणाले की, देशात पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. यात राजस्थानबद्दल अनेक कयास बांधले जात आहेत, मात्र काँग्रेस पक्ष सर्वत्र चांगली कामगिरी करत आहे. काँग्रेस या निवडणुकीत राजस्थानमध्ये निवडणूक जिंकणार आहेच, मात्र त्यासोबतच इतरही चार म्हणजे छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश, मिझोरम या राज्यांमध्ये काँग्रेस जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. DK Shivakumar
दरम्यान, पाच राज्यांपैकी तेलंगणा वगळता उर्वरीत चारही राज्यांमधील मतदान पार पडले आहे. ३० नोव्हेंबरला तेलंगणामध्ये मतदान होत आहे. पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबरला जाहिर होणार आहे. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलाचे चित्र दिसते, त्यामुळे या वेळी काय होईल असा प्रश्न राजकीय वर्तुळात कायम चर्चेत आहे. यावेळी काँग्रेसला मात्र बदलाची अपेक्षा आहे. याचबद्दल काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनीही दिल्लीत असताना आपले मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT