मुंबई : पुढारी वृत्तसेवा
पालिकेच्या परळ एफ-दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुधारणा करण्याकरिता शिवडी बस डेपोसमोर जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईसह परळ व भायखळा आदी भागात मंगळवार (दि.७) सकाळी १० वाजल्यापासून बुधवार (दि.८) सकाळी १० वाजेपर्यंत या भागात पाणी कपात लागू करण्यात आली आहे.
या कालावधीत महानगरपालिकेच्या एफ-दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गाव, काळेवाडी, नायगांव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर तसेच दक्षिण मुंबईतील गुलाबा ओल्ड नरिमन पॉईंट पायधुनी मोहम्मद अली रोड भेंडी बाजार व भायखळा ई-विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर शहर उत्तर व दक्षिण परिसरातील काही भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.