Latest

Watch Video : चक्क विगमध्ये लपवलं ३३ लाखांचं सोनं, प्रवाशाला अटक

backup backup

वाराणसी, पुढारी ऑनलाईन : वाराणसी विमानतळावर एका कस्टम अधिकाऱ्यांनी शनिवारी सौदी अरेबियामधून आलेल्या एका प्रवाशाकडून ४५ लाखांचं सोनं जप्त केलं आहे. शारजाहमधून एअर इंडियाच्या फ्लाइटमधील एका प्रवाशाने चक्क आपल्या विगमध्ये हे सोनं लपविले होतं. संबंधित कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "४५ लाखांचं सोनं एका प्रवाशाच्या वीगमधून जप्त करण्यात आलं आहे." (Watch Video)

या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये संबंधित कस्टम अधिकारी प्रवाशाच्या डोक्यावरून विग काढताना दिसत आहे. विग काढल्यानंतर काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये सोनं घालून ती पिशवी डोक्यावर विगखाली चिकटवलेली होती", असा व्हिडिओ मुकेश सिंह सेंगर या ट्विटर युजर्सने शेअर केला आहे.

अधिकाऱ्याने सांगितलं की, "विगखालील त्या काळ्या रंगाच्या पिशवीत ६४६ ग्रॅम सोनं होतं. त्याची किंमत ३२.९७ लाख इतकी आहे. त्या फ्लाईटमध्ये असणारा आणखी एका प्रवाशाकडे २३८.२ ग्रॅम सोनं सापडलं, ज्याची किंमत १२.१४ लाख इतकी आहे. प्रवाशाने ज्या कार्टनला घेऊन जात होता, त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये सोनं लपविण्यात आलं होतं." (Watch Video)

काही दिवसांपूर्वीच सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडण्यात आलं होतं, त्या दोघांनी सोन्याची पेस्ट करून तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. इंदिरा गांधी विमानतळावरील शारजाहमधून आलेल्या दोन भारतीयांना विदेशात निर्मिती झालेल्या सिगारेट आणि सोन्याची पेस्टची तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.

सीमा शुल्क विभाग आयुक्त कार्यालयाने सांगितले की, गुरूवारी सौदी अरेबियातून आलेल्या दोन भारतीयांना विमानतळाच्या के टर्मिनल-३ वर थांबवण्यात आलं. झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे विदेशनिर्मित ६३६ सिगरेट्स जप्त करण्यात आल्या, त्याची किंमत ९ लाख ५४ हजार इतकी आहे.

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT