वारी पंढरीची

Ashadhi Ekadashi Chaturmas start : आषाढी एकादशी : चातुर्मासाची सुरुवात...

Beginning of Chaturmas 2026: या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत (क्षीरसागरात) विश्रांतीसाठी जातात, अशी आख्यायिका आहे

पुढारी वृत्तसेवा

राज्यभरात २५ जुलै रोजी साजरी होणारी आषाढी एकादशी (ज्याला 'देवशयनी एकादशी' असेही म्हणतात) ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र एकादशींपैकी एक आहे. हा सण चातुर्मासाची सुरुवात मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत (क्षीरसागरात) विश्रांतीसाठी जातात, अशी आख्यायिका आहे.

  • तिथी

    एकादशी तिथी २५ जुलै रोजी सकाळी ११.३४ पर्यंत राहील. तिथीनुसार मुख्य व्रत २५ जुलै रोजी पाळले जाईल.

  • पारणा (उपवास सोडण्याची वेळ)

    २६ जुलै रोजी सूर्योदयांतर पहाटे ५.३९ ते सकाळी ८.२२ या वेळेत उपवास सोडणे शुभ मानले जाते.

  • वारकरी परंपरा

    आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांचे महाकुंभमेळावे.

  • पूजेचे महत्त्व

    या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठन करणे आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक मानले जाते.

  • पवित्र स्नानाची परंपरा

    आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागा नदीत स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

  • विठ्ठल दर्शनापूर्वी स्नान

  • वारकरी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी चंद्रभागेत स्नान करून शुद्धिकरण करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT