छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी दि. २५ जून २०२३ रोजी राज्य शासनाला सादर केलेल्या स्वेच्छानिवृत्ती अर्जास मंगळवारी (दि. २७) मान्यता देण्यात आली.
केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी आपल्या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवला होता. तसेच दि. ३ जुलैरोजी स्वेच्छा सेवानिवृत्त करावे, असे अपर मुख्य सचिव (सेवा ) नितीन गद्रे यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. दरम्यान, केंद्रेकर यांनी ११ फेब्रुवारी २०१९ रोजी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.
केंद्रेकर यांनी विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त आणि आता विभागीय आयुक्त पदावर त्यांनी काम केले आहे. बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली झाली. त्यानंतर त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. शेतकरी कुटुंबातून आलेल्या केंद्रेकरांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी असताना त्यांनी अचानक घेतलेल्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा;