पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे Vistex Asia कंपनीच्या २५ व्या वर्धापनदिनी म्हणजे रौप्यमहोत्सवी सोहळ्यादरम्यान स्टेज कोसळल्याने CEO संजय शाह यांचा मृत्यू झाला. तर अन्य एका अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९) दिली.
अधिक मिळालेल्या हितीनुसार, विसटेक्स एशियाने हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता. गुरुवारी (दि.११) संध्याकाळी सीईओ संजय शाह आणि त्यांचे सहकारी रौप्यमहोत्सवी समारंभाला उपस्थित होते. दरम्यान ते कार्यक्रमाचा भाग म्हणून एका लोखंडी स्टेजवर गेले असता स्टेजला धरलेली साखळी एका बाजुने तुटली आणि ते दोघेही उंचीवरुन खाली पडले. असे पोलिसांनी सांगितले.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान शाह यांचे निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. तर त्यांच्या सहकाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. कंपनीच्या अन्य अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे फिल्म सिटी इव्हेंट मॅनेजमेंट अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा