विश्वसंचार

चौदा कोटी रुपयांना उंटाची झाली विक्री

अनुराधा कोरवी

रियाध ः सौदी अरेबियामध्ये एका उंटाची तब्बल चौदा कोटी रुपयांना विक्री झाली आहे. हा जगातील सर्वात महागडा उंट ठरला आहे. त्याची 7 दशलक्ष सौदी रियाल म्हणजेच सुमारे 14 कोटी 23 लाख रुपयांमध्ये बोली लागली.

या उंटासाठी सौदी अरेबियात सार्वजनिक लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियात आला आहे. पारंपरिक पोशाखातील एक व्यक्‍ती मायक्रोफोनच्या माध्यमातून लिलावाची बोली लावत असताना यामधून दिसून येते.

या उंटाची सुरुवातीची बोली 5 दशलक्ष सौदी रियाल म्हणजेच सुमारे 10 कोटी 16 लाख रुपये ठरवण्यात आली होती. त्यानंतर या उंटाचा 7 दशलक्ष सौदी रियालमध्ये लिलाव करण्यात आला. हा उंट कुणी खरेदी केला हे मात्र उघड केले गेले नाही. हा उंट जगातील अतिशय दुर्मीळ उंटांपैकी एक असल्याचे मानले जाते. एका विशेष प्रजातीचा हा उंट असून या प्रजातीचे उंट अतिशय कमी संख्येत आहेत.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT