वॉशिंग्टन : सध्याच्या मध्य युरोपातील बिर्च आणि पाईन वृक्षांची दाटी असलेल्या जंगलात, एका प्राचीन सरोवराच्या काठी अनेक प्रकारचे प्राणी आपली तहान भागवण्यासाठी गोळा झाले होते. त्यामध्ये हत्ती, गेंडे अशा विशालकाय प्राण्यांबरोबरच माणसाच्या सुरुवातीच्या काळातील पूर्वजांचाही समावेश होता. कुटुंबातील लहान-थोर या सरोवराजवळ येऊन त्यांनी आपली तहान भागवली आणि पाण्यात मनसोक्त डुबक्याही घेतल्या. या माणसांच्या पाऊलखुणा तिथे उमटल्या. आता या पाऊलखुणांचा शोध घेण्यात आला आहे. (Paleolithic)
तब्बल 30 लाख ते तीन लाख वर्षांपूर्वीच्या काळाला लोअर पॅलिओलिथिक काळ म्हटले जाते. याच काळातील सुमारे 3 लाख वर्षांपूर्वीच्या तीन अत्यंत दुर्मीळ अशा पाऊलखुणा किंवा पायांचे ठसे सापडले आहेत. वायव्य जर्मनीत 'होमो हिडेलबगेन्सिस' या लुप्त झालेल्या मानव प्रजातीच्या या पाऊलखुणा आहेत. ही मानवप्रजाती सुमारे 7 लाख ते दोन लाख वर्षांपूर्वीच्या काळात अस्तित्वात होती. त्याच काळात प्रागैतिहासिक काळातील हत्ती आणि गेंडेही होते. त्यांच्याही पायांचे ठसे याठिकाणी सापडले आहेत. सात हजार वर्षांपूर्वीच्या अशाच मानव व प्राण्यांच्या सहजीवनाच्या खुणा इथियोपियातही सापडल्या होत्या. मात्र, आता जर्मनीत एच. हिडेलबर्गेन्सिसच्या पावलांच्या खुणा प्रथमच सापडल्या आहेत. जगभरात आतापर्यंत अशा केवळ चारच पाऊलखुणा आहेत. (Paleolithic)
हेही वाचा;