पिरॅमिडचा दरवाजा 4400 वर्षांनी उघडणार! Pudhari photo
विश्वसंचार

पिरॅमिडचा दरवाजा 4400 वर्षांनी उघडणार!

साहुरा पिरॅमिडशी संबंधित अनेक रहस्य उलगडणार

पुढारी वृत्तसेवा

कैरो ः इजिप्त... असं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात पिरॅमिड. इजिप्तचे हजारो वर्षांपूर्वीचे हे पिरॅमिड संपूर्ण जगासाठी मोठं रहस्य आहे. इजिप्तच्या पिरॅमिड संदर्भातील अनेक रहस्य अद्याप उलगडलेली नाहीत. यापैकीच एक आहे ते साहुराचा पिरॅमिड. साहुरा पिरॅमिडमधील एका खोलीचा दरवाजा 4400 वर्षांनंतर उघडणार आहे. या बंद दरवाजाआड दडलेली अनेक रहस्य उलगडणार आहेत. इजिप्शियन फेरो (राजा) साहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी हा पिरॅमिड बांधला होता.

या रहस्यमयी पिरॅमिडमधील बंद असलेली खोली उघडण्यात येणार आहे. यामुळे पिरॅमिडचे संरचनात्मक मूळ आणि पिरॅमिडच्या आत फेरो साहुरा संदर्भातील अनेक रहस्य उलगडणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. ज्युलियस-मॅक्सिमिलियन्स-विद्यापीठाची एक टीम साहूराच्या पिरॅमिडबाबत संशोधन करत आहे. साहुरा पिरॅमिडवर संशोधन करणार्‍या टीमने या पिरॅमिडमधील गुप्त दरवाजे शोधले आहेत. 3डी लेझर स्कॅनिंग आणि क्षेत्राचे नकाशे यांच्या मदतीने ते पिरॅमिडच्या आत असलेल्या आठ खोल्यांपैकी एक गुप्त मार्ग उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. या गुप्त दरावाजाआड अनेक रहस्य दडलेली आहेत. हे गुप्त दरवाजे उघडल्यास साहुरा पिरॅमिडशी संबंधित अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये राजा महाराजांच्या ममी जतन करण्यात आल्या आहेत. इजिप्तमध्ये राजा-राणी किंवा संपन्न घराण्यातील व्यक्तींचे मृतदेह विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करून कायमस्वरुपी जतन करून ठेवले जायचे. याला ‘ममी’ म्हणतात. अभ्यासक ममीफिकेशन, त्याचा धार्मिक विधी, पद्धती आणि वेगवेगळ्या टप्प्यांबाबत अजूनही संशोधन करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT