रोम : आपल्या ताफ्यात आलिशान कार असावी, असे कोणाला वाटत असेल तर त्यात आश्चर्याचे कारण नाही. जो मांगोगे, वो मिलेना, हा ‘युनिव्हर्स’चा नियमदेखील यावेळी आठवल्याशिवाय राहणार नाही. आता आलिशान कार म्हणजे महागडी असणार हे साहजिकच! पण सर्वात महागडी कार किती किमतीची? असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर क्षणभर थक्क करायला लावणारे असेल, हे सुनिश्चित.
खरे तर जगभरात महागड्या असंख्य अशा कार आहेत. या कार बहुतांश खेळाडू किंवा सेलिब्रिटिंकडे पाहायला मिळतात. अगदी बड्या उद्योगपतींच्या ताफ्यातही त्या दिसून येतात. पैशाचा काही प्रश्नच नसल्याने असे अब्जाधीश, कोट्यधीश त्यावेळी एकापेक्षा एक महागडी आणि टॉप फिचर असणारी कार निवडतात आणि ती आलिशान, महागडी कार त्यांच्या ताफ्यात दाखल होते. हे पाहून अनेकांना आपण ही अशी गाडी घ्यावी, असे वाटत असते. ज्या लोकांना अशा आलिशान कारची आवड आहे, असे लोक सर्व कार आणि त्यांच्या फिचरबद्दल नेहमीच माहिती ठेवतात. महागड्या कारच्या जगतात यापेक्षा वेगळी स्थिती नाही.
आता जगातील सर्वात महागडी कार कोणती असेल? तर ती आहे रोल्स रॉयस बोट टेल! ही कार इतकी महाग आहे की, ती विकत घेणे प्रत्येकासाठी कठीण आहे. रोल्स रॉईसने 2021 च्या अखेरीस इटलीत आजपर्यंतची जगातील सर्वात महागडी कार बोट टेल लाँच केली होती. बेस्पोक वाहन अधिकृतपणे जगातील सर्वात महागडी कार आहे. या कारची किंमत 28 दशलक्ष यूएस डॉलर आहे, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 228.75 कोटी रुपये आहे.