वॉशिंग्टन डीसी : एलियन्स आपल्या पृथ्वीवरील लोकांशी संपर्क का करत नाहीत, याबद्दल अमेरिकेच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड’ येथील एका शास्त्रज्ञाने एक अतिशय विचित्र आणि कदाचित तुम्हाला राग येईल असे कारण सांगितले आहे. त्यांच्या मते, एलियन्सनी माणसांशी संपर्क साधण्याचे सोडून दिले, कारण त्यांना माणसांचा कंटाळा आला आहे! थोडक्यात, एलियन्सनी वैतागून माणसांचा नाद सोडून दिला आहे, असे या नासामध्ये काम केलेल्या संशोधक महाशयांचे म्हणणे आहे.
आपल्याकडे एलियन्स अस्तित्वात आहेत की नाही याचे कोणतेही ठोस पुरावे नसले, तरी जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्या जगातील लोकांबद्दल बोलतो, तेव्हा पृथ्वीवर ‘यूएफओ’ (णऋज) कोसळल्याच्या किंवा पाहिलेल्याच्या घटना नेहमीच चर्चेत येतात; पण एलियन्स आपल्या ग््राहावरील लोकांशी संपर्क का साधत नाहीत, या प्रश्नाने अनेकजण हैराण आहेत. या विषयावर आधारित एका नवीन शोधनिबंधात ‘रॅडिकल वर्ल्डलीनेस’ (कट्टरपंथी सांसारिकता) या सिद्धांतानुसार हा विचार मांडला गेला आहे.
या सिद्धांतानुसार, एलियन्स अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने युक्त आहेत, जे पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीपेक्षा खूपच विकसित आहे. हा तर्क ‘फर्मी पॅराडॉक्स’वर आधारित आहे, जो आकाशगंगेतील प्रगत तंत्रज्ञान वापरणाऱ्या सभ्यतेच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतो. मेरीलँड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ डॉ. रॉबिन कॉर्बेट यांनी सांगितले की, ‘विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एलियन्स आपल्यापेक्षा खूप जास्त नाही, तर फक्त थोडे-अधिक प्रगत आहेत. हे असे आहे जसे की, तुमच्याकडे ‘आयफोन 17’ ऐवजी ‘आयफोन 42’ असेल. शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, जर असे असेल, तर एलियन्सना अंतराळ संशोधन आणि ग््राहांवर पाठवल्या जाणाऱ्या माहितीचा कंटाळा आला असेल.
लेखक आर्थर सी. क्लार्क यांनी यावर भाष्य करताना म्हटले होते की, ‘दोनच शक्यता आहेत : एकतर आपण या बह्मांडात एकटे आहोत किंवा आपण नाही. आणि या दोन्ही गोष्टी भीतीदायक आहेत.’ दरम्यान, या अभ्यासावर जोड्रेल बँक सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्सचे संचालक प्रोफेसर मायकल गॅरेट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, ‘हा विचार उर्वरित बह्मांडाबद्दल मानवाचा निष्काळजीपणा दर्शवतो.’ थोडक्यात, एलियन्सनी संपर्क न साधण्यामागे त्यांची प्रगत बुद्धिमत्ता आणि त्यामुळे आलेला ‘कंटाळा’ हे कारण असू शकते, असा तर्क या नव्या संशोधनात मांडला गेला आहे.