विश्वसंचार

Marriage with Cat : ‘तिने’ मांजराशीच केले लग्‍न!

मोनिका क्षीरसागर

लंडन : येथील 49 वर्षांच्या डेबोरा हॉज नावाच्या एका महिलेने आपल्या पाळीव मांजराशीच लग्‍न केले आहे. एका उद्यानात तिने या मांजराशी थाटामाटात विवाह केला! लग्‍नावेळी तिने स्मार्ट टक्सिडो परिधान केला होता तर तिच्या जमाल नावाच्या या मांजराला बो टाय आणि कॅप घातली होती. हा सर्व प्रकार तिने आपल्या घरमालकाला अद्दल घडवण्यासाठीही केला. तिच्या घरमालकाने दोन पाळीव प्राण्यांना बाहेर काढण्याची धमकी दिली होती.

2017 मध्ये मोगी नावाचे हे मांजर ती आणि तिच्या दोन मुलांच्या कुटुंबाचा एक भाग बनले होते. त्याला बाहेर काढले जाऊ नये यासाठी तिने हा खटाटोप केला. तिने सांगितले, माझ्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते आणि मिळवण्यासाठी सर्व काही होते. त्यामुळे मी माझ्या मांजराशी लग्‍न केले. तिने सांगितले की माझे हेतू आधीच ठरलेले होते आणि मला माझ्या मांजरापासून वेगळे व्हायचे नाही. कारण मी त्याच्यावर खूप प्रेम करते. या लग्‍नसमारंभाला तिच्या काही खास मित्रांनी हजरे लावली होती. आता या नवविवाहित जोडप्याला कुणी वेगळे करू शकणार नाही, असे तिला वाटते!

रजनीकांत स्टाईल डोसा खाल्ला आहे का? Mumbai Stree Food | Rajinikanth Dosa Mumbai

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT