एका व्यक्तीने चक्क डोळ्यात कॅमेरा बसवला आहे. Pudhari File Photo
विश्वसंचार

चक्क डोळ्यात बसवला कॅमेरा!

डोळ्यात शूट हाेताे 30 मिनिटांचा व्हिडीओ

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : सध्याच्या जमान्यात आपल्या शरीरामध्ये कोण कसले बदल घडवून आणेल हे काही सांगता येत नाही. कुणी बार्बी बाहुलीसारखे दिसावे म्हणून अनेक शस्त्रक्रिया करते तर कुणी पिअर्सिंग आणि टॅटूंनी आपले रुपडे पालटून टाकते. तंत्रज्ञानासाठीही काही लोक आपल्या शरीरात काही बदल घडवून आणत असतात. आता रेड लाईट एरियावर लक्ष ठेवण्यासाठी एका व्यक्तीने चक्क डोळ्यात कॅमेरा बसवला आहे. एका व्यक्तीने आपल्या खर्‍या खुर्‍या आयुष्यात ‘टर्मिनेटर’ या हॉलीवूडपटासारखा थ्रील केला आहे.

व्यक्तीने चक्क डोळ्यातच बसवला कॅमेरा

डोळा हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. डोळ्यांमुळेच आपण हे जग पाहू शकतो. डोळे हे आपल्या शरीरात कॅमेर्‍याप्रमाणेच काम करतात. डोळे आपल्या मज्जासंस्थेशी जोडलेले असतात व यामुळेच आपण समोरचे द़ृश्य सहज पाहू शकतो. मात्र, एका व्यक्तीने जगावेगळा प्रयोग केला आहे. या व्यक्तीने आपला खरा डोळा काढून तिथे चक्क कॅमेरा बसवला आहे. जगावेगळा प्रयोग करणारा हा व्यक्ती म्हणजे चित्रपट निर्माते रॉब स्पेन्स. त्यांच्या या अनोख्या प्रयोगामुळ ते रिअल लाईफ टर्मिनेटर तसेच आयबॉर्ग नावाने ओळखले जात आहेत. ‘टर्मिनेटर’ हा हॉलीवूडचा लोकप्रिय थ्रीलिंग चित्रपट आहे. रॉब स्पेन्स यांनी 2007 मध्ये खरा डोळा काढला व त्या जागी बनावट डोळ्याच्या आत त्यांनी एक कॅमेरा बसवला. या कॅमेर्‍यात बॅटरी, सर्किट बोर्ड आणि कॅमेरा सेन्सर आहे.

अपघात डोळा निकामी झाला हाेता

रॉब स्पेन्स लहान असताना त्यांचा अपघात झाला होता. गोळीबार करताना चुकीच्या पद्धतीने बंदूक धरली होती. त्यामुळे त्यांना गोळी लागली होती. गोळी लागल्याने त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. दरम्यान, त्यांचा डोळा निकामी झाला. यानंतर त्यांचा खरा डोळा काढण्यात आला. आणखी एक शस्त्रक्रिया करून त्यांना एक कृत्रिम डोळा बसविण्यात आला. कृत्रिम डोळ्याच्या ऐवजी कॅमेरा बसवावा, अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. यानंतर त्यांनी कृत्रिम डोळा काढून कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला. रॉब स्पेन्सचे सहकारी असललेले डिझायनर कोस्टा ग्राममॅटिस यांनी त्यांना मदत केली. कोस्टा ग्राममॅटिस यांनी त्यांच्यासाठी एक वायरलेस कॅमेरा डिझाईन केला.

कृत्रिम डोळ्यात शूट हाेताे 30 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड

कृत्रिम डोळ्याच्या आत हा कॅमेरा बसवता येईल असा सूक्ष्म कॅमेरा त्यांनी तयार केला. इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या मार्टिन नावाच्या त्यांच्या आणखी एका सहकार्‍याने त्यांना मदत केली. मार्टिन यांनी एक छोटा सर्किट बोर्ड तयार केला. या सर्किटच्या मदतीने वायरलेस कॅमेरा डेटा स्टोर करून शेअर करू शकतो. लाईव्ह सायन्सच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या वायरलेस कॅमेरामध्ये मायक्रो ट्रान्समीटर, छोटी बॅटरी, मिनी कॅमेरा आणि मॅग्नेटिक स्विच देण्यात आला आहे. या स्विचच्या मदतीने डोळ्यातील कॅमेरा चालू आणि बंद करता येऊ शकतो. डोळ्यात बसवलेला हा कॅमेरा एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 30 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. हा कॅमेरा ऑप्टिक नर्व्ह सिस्टिमला जोडलेला नसला तरी तेफिल्म मेकिंगसाठी या कॅमेर्‍याचा डेटा वापरतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT