विश्वसंचार

Gift : एका गिफ्टमुळे चिमुरडी झाली लाखोंची मालकीण

Arun Patil

बोस्टन : 'देव जेव्हा देतो तेव्हा छप्पड फाड देतो', अशी म्हण आहे. (Gift) लक्ष्मी कधी आपल्या घराचा दरवाजे ठोठावेल हे कोणालाच माहीत नसते. अनेक जण कष्ट न करता श्रीमंत होण्यासाठी लॉटरीचे तिकीट विकत घेतात. ही लॉटरी पण प्रत्येकाला लागतेच असे नाही. त्यासाठी नशिबाची साथ असावी लागते. आता अमेरिकेतील एका चिमुकलीला कागदाची एक स्लिप मिळाली आणि ध्यानीमनी नसतानाही ती आज लाखोंची मालकीण झाली.

चिमुकलीच्या पालकांनी नाताळच्या दिवशी गिफ्ट (Gift) एका गिफ्टमुळे चिमुरडी झाली लाखोंची मालकीण)आणले होते. त्यातील एका गिफ्टमध्ये एक स्लिपही होती. सुरुवातीला त्या गिफ्टच्या(Gift) बॉक्समध्ये काय आहे कोणालाही माहिती नव्हते. काही दिवसांनी त्या लहान मुलीने ती स्लिप पाहिली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, ती स्लिप म्हणजे लॉटरीचे तिकीट होते. मेरीलँड लॉटरीच्या पेपरमिंट पेआऊट गेमची तीन लॉटरीची तिकिटे त्यात होती. त्या मुलीने एक-एक करून त्या तिकिटावरील नंबर खरडायला सुरुवात केली. पहिल्या दोन तिकिटांमधून तिच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे ती निराश झाली. तरीदेखील तिने तिसरे तिकीट स्क्रॅच केले आणि तिचे नशीब चमकले.

तिसर्‍या क्रमांकात तिला 30 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 24.45 लाख रुपयांचा जॅकपॉट लागला. ही घटना अमेरिकेतील मेरीलँडची आहे. जर्मनटाऊनमध्ये राहणार्‍या या चिमुरडीला नाताळचे गिफ्ट मालामाल करून गेले. यापूर्वी अमेरिकेत एका ट्रक ड्रायव्हरने लॉटरीचे तिकीट जिंकले होते. त्याच्या ट्रकचे ओडोमीटर तुटले. या तुटलेल्या ओडोमीटरवर एक नंबर होता. त्याने या क्रमांकाचे तिकीट खरेदी केले आणि तो करोडपती झाला.

-हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT